अखेर संजय राऊतांनी शरद पवारांना विचारला राज्यभरात चर्चिला जाणारा 'तो' प्रश्न

अखेर संजय राऊतांनी शरद पवारांना विचारला राज्यभरात चर्चिला जाणारा 'तो' प्रश्न

संजय राऊत यांनी शरद पवारांना राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चिला जाणारा प्रश्नही विचारला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 जुलै : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत (Sharad Pawar Interview) लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र त्याआधी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळत आहेत.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये शरद पवार हे भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांविषयी भाष्य करत असल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत भाजपल्या मिळालेल्या 105 जागांमध्ये शिवसेनेचं मोठं योगदान असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी संजय राऊत यांनी शरद पवारांना राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जाणारा प्रश्नही विचारला आहे. 'ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?' असा थेट प्रश्न राऊतांनी शरद पवारांना विचारला. त्यावरील उत्तर मुलाखतीचा संपूर्ण भाग प्रसारित झाल्यानंतरच पाहायला मिळणार आहे.

पहिल्या भागात कोरोनाचा सुरू असलेला प्रादुर्भाव ते राम मंदिर पर्यंतच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. येत्या शनिवारी या मुलाखतीचा पहिला भाग शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांवर प्रसिद्ध होणार आहे. 11, 12 आणि 13 जुलै रोजी या मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणार आहे.

संजय राऊत यांनी आत्तापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. सामनामधून या मुलाखती आल्यानंतर अनेकदा देशभर वादळं निर्माण झाली होती. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरं चांगलीच गाजली होती. आता संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे.

दरम्यान, 'सत्ता स्थापन प्रक्रियेविषयी शरद पवारांची खुली मुलाखत घ्यायची होती, पण काही कारणानं ती मागे पडली. पवार साहेबांच्या खासगी मुलाखती शेकडो घेतल्यात, पण खुली मुलाखत आता घेत आहे. अन्य राजकीय नेत्यांच्याही मुलाखती घेणार आहे,' असं संजय राऊत यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं.

Published by: Akshay Shitole
First published: July 9, 2020, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading