Home /News /mumbai /

"त्या" विधानानंतर संजय राऊतांनी शेअर केला VIDEO आणि म्हणाले...

"त्या" विधानानंतर संजय राऊतांनी शेअर केला VIDEO आणि म्हणाले...

Sanjay Raut: शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर : दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका करताना आक्षेपार्ह विधान केलं. संजय राऊत यांनी केलेल्या या विधानावरुन भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याच दरम्यान आता संजय राऊत यांनी पुन्हा एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी एक व्हिडीओ सुद्धा पोस्ट केला आहे. (Sanjay Raut tweet video after bjp deamnd fir against him) दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एक आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता. या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक होत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. वाचा : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, 'त्या' विधानावरुन संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी काय म्हणाले होते संजय राऊत? राज्यसभेच्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या विरोधात निलंबित 12 खासदार हे संदसेदच्या परिसरात आंदोलन करत आहेत. या आंदोलनस्थळी मंगळवारी शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी संजय राऊत हे खुर्ची उचलून शरद पवारांना बसण्यासाठी देतानाचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरुन भाजपनेही निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, "त्यावेळी तेथे लालकृष्ण अडवाणी जरी उपस्थित असते तर मी त्यांनाही खुचर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचे वय लक्षात गेता महाराष्ट्रातल्या पितृतुल्य, वडीलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही जर गोष्ट गुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राराची संस्कृती नसून विकृती आहे." याच दरम्यान भाजपवर टीका करताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दही उच्चारले आणि त्यावरुनच भाजपने आता संजय राऊतांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजपने काय म्हटलं? शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज भाजप आणि भाजपच्या महिलांबाबत अत्यंत असभ्य आणि घाणेरडा शब्द वापरला. संजय राऊत यांनी तो शब्द एकदा नाही तर दोनदा वापरला. त्याच्यावरुन भाजपने याबाबत तक्रार दाखल केली आहे आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा अशी आमची मागणी आहे. राज्य महिला आयोग आणि केंद्रीय महिला आयोगाकडे संजय राऊत यांच्या तक्रार दाखल करणार आहोत असं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Sanjay raut

    पुढील बातम्या