आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार- संजय राऊत

आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार- संजय राऊत

शिवसेनेने आपला अजेंडा निश्चित केला आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार असून यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व अमित शहा यांच्या भेटीबद्दल दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 जून : शिवसेनेने आपला अजेंडा निश्चित केला आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार असून यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व अमित शहा यांच्या भेटीबद्दल दिली आहे. 2019 च्या निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या अजेंडावर शिवसेना ठाम असल्याचं संजय राऊत यांनी पुन्हा बोलून दाखवलं.

यावर न्यूज18लोकमतशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, आमचा प्रयत्न आहे की युती झाली पाहिजे. त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न असेल.

काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास मॅरेथाॅन बैठक पार पडली. त्यानंतर संजय राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली.

First published: June 7, 2018, 11:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading