मनी आणि मुनींच्या जोरावर भाजपने मीरा-भाईंदर जिंकलं-संजय राऊत

मनी आणि मुनींच्या जोरावर भाजपने मीरा-भाईंदर जिंकलं-संजय राऊत

जामा मशिदींचे इमाम याआधी असे फतवे काढत होते. तेच फतवे मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीत जैन मुनींनी काढले, असंही संजय राऊत म्हणाले.

  • Share this:

23 आॅगस्ट : मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक भाजपने मनी आणि मुनीच्या बळावर जिंकली असा आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मीरा-भाईंदरमध्ये भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या जैन मुनी नयपद्मसागरजी महाराज यांची तुलना शिवसेनेने थेट झाकीर नाईकशी केली. नयपद्मसागरजी महाराज यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

जामा मशिदींचे इमाम याआधी असे फतवे काढत होते. तेच फतवे मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीत जैन मुनींनी काढले, असंही संजय राऊत म्हणाले. आता यापुढे जर कुणी अशा प्रकारे धार्मिक चिथावणीखोर मुनींनी शिवसेनेसंदर्भात एक शब्द बोलला तर त्यांची गाठ शिवसेनेशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

आतापर्यंत शिवसेनेला अनेक जैन मुनींचे आशिर्वाद मिळालेले आहेत. पण मीरा भाईंदरचा हा जैन मुनी म्हणजे जोकर आहे, अतिरेकी आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आठ जैन उमेदवार उभे केले होते. त्यातला एक उमेदवार विजयी ठरला. अन्य सात जण दुसऱ्या स्थानावर राहिले.

First published: August 23, 2017, 1:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading