शिवसेनेच्या यादीतून 'या' मोठ्या नेत्याचा पत्ता कट, या नेत्यांकडे जबाबदारी

या यादीत असलेले नेतेच पक्षाची भूमिका मांडतील आणि पक्षाच्या मुद्यांवर प्रतिक्रिया देतील.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 07:51 PM IST

शिवसेनेच्या यादीतून 'या' मोठ्या नेत्याचा पत्ता कट, या नेत्यांकडे जबाबदारी

मुंबई,20 ऑक्टोबर: राज्यात उद्या, 21 ऑक्टोबर, विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मीडिया डिपार्टमेटने 18 नेत्यांची यादी जाहीर केली आहे. निकालाच्या दिवशी पक्षाच्या वतीने बोलण्याऱ्या प्रवक्त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, या यादीतून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना वगळण्यात आले आहे.

शिवसेनेच्या मीडिया विभागाचे प्रमुख हर्षल प्रधान यांनी दिलेली माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पक्षाच्या वतीने बोलण्याऱ्या 18 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत असलेले नेतेच पक्षाची भूमिका मांडतील आणि पक्षाच्या मुद्यांवर प्रतिक्रिया देतील. प्रसारमाध्यमांनीही या यादीत असलेल्या अधिकृत प्रवक्त्यांकडूनच प्रतिक्रिया घ्याव्यात, अशी विनंती हर्षल प्रधान यांनी केली आहे.

या यादीत अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, विशेषा राऊत, भावना गवळी, राहुल शेवाळे, धैर्याशील माने, अनिल परब, मनीषा कायंडे आणि सुनील शिंदे यांचा समावेश आहे. या नेत्यांसोबतच सुरेश चव्हाण, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, हेमराज शहा, साईनाथ दुर्ग, किशोर कान्हेरे, शितल म्हात्रे आणि शुभा राऊल हे पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम पाहतील. तसेच, एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही माध्यमांशी बोलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

दरम्यान, याआधी राज्यसभेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर अनेकवेळा टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील प्रवक्तेपद जबाबदारी काढून घेतल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती केली आहे.

'बहीण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न', धनंजय मुंडे झाले भावुक, पाहा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...