Home /News /mumbai /

'जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री रस्त्यावर जे होते ती खरी शिवसेना': संजय राऊत

'जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री रस्त्यावर जे होते ती खरी शिवसेना': संजय राऊत

या सर्वावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम असल्याचं म्हटलं आहे.

    मुंबई 23 जून : शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले आहेत. अजूनही अनेक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेतील दोन तृतीयांशहून अधिक आमदार शिंदे गटात सामील होत आहेत. या सर्वावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम असल्याचं म्हटलं आहे. FB LIVE वर भावनिक आवाहन, सामनाच्या अग्रलेखातून कडक इशारा; कशी आहे ठाकरी रणनीती? पुढे राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही. या बंडखोर आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं. यांना मी बंडखोर नाही तर बदमाश म्हणेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला. पुढे राऊत म्हणाले की जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री रस्त्यावर जे होते ती खरी शिवसेना आहे. आता देवेंद्र फडणीवस नॉट रिचेबल! महाराष्ट्रातली राजकीय उलथापालथ शेवटच्या टप्प्यात 20 लोक आमच्या संपर्कात आहेत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. फक्त बाळासाहेबांचे भक्त बोलून चालत नाही. तर बाळासाहेबांचे भक्त कधीही दबावाला बळी पडून बाहेर जात नाहीत, असंही राऊत म्हणाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या