'अब की बार उद्धव सरकार', अमित शहांच्या एंट्रीआधी शिवसेनेचा नारा

शिवसेनेनं 'अब की बार उद्धव सरकार' असा नवा नारा दिला आहे. यातून आगामी काळात मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही असणार हे स्पष्ट झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 12:34 PM IST

'अब की बार उद्धव सरकार', अमित शहांच्या एंट्रीआधी शिवसेनेचा नारा

मुंबई, 18 फेब्रुवारी : शिवसेना-भाजप युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज संध्याकाळी मातोश्रीवर येणार आहेत. पण त्याआधी शिवसेनेनं 'अब की बार उद्धव सरकार' असा नवा नारा दिला आहे. यातून आगामी काळात मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही असणार हे स्पष्ट झालं आहे.

"आज संध्याकाळी अमित शाह 'मातोश्री'वर येणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस हेदेखील असतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चा होईल. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल. युतीचे जे काही फॉर्म्युले आहेत ते सर्व दोन्ही प्रमुख नेते घोषणा करतील," अशी माहिती देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यात 'अब की बार उद्धव सरकार' अशी घोषणा दिली आहे.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांवर दोन्ही पक्षांचे प्रमुख अंतिम शिक्कामोर्तब करतील. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असाच थेट सामना होणार आहे.

युतीसाठी काय आहेत शिवसेनेच्या अटी?

१) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ देणार. त्यामुळे महाराष्ट्रातील ४८ पैकी शिवसेना २३ तर भाजप २५ जागांवर उमेदवार उभे करणार.

Loading...

२) विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी शिवसेना १४४ आणि भाजप १४४ असा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला असणार.३) शिवसेनेनं ही युती फक्त भाजपशी केलेली आहे. भाजपच्या मित्र पक्षांशी नाही.

४) त्यामुळे भाजपच्या १४४ जागांपैकी त्यांना मित्र पक्षांसाठी किमान २० जागा सोडाव्या लागतील.

५) भाजपच्या मित्र पक्षांच्या जागेवर शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार.

६) त्यामुळे विधानसभेत शिवसेना १६४ पर्यंत उमेदवार उभे करू शकते.

७) युतीतील जागावाटपाबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही शिवसेनेनं आग्रही भूमिका ठेवली आहे. युती करताना ही प्रमुख अट ही ठेवण्यात आली होती.

८) शेतकऱ्यांना १००% कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादित पिकांना हमीभाव आणि दुष्काळग्रस्त गावांत तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.


VIDEO : शरद पवारांना 'शकुनी मामा'म्हणता, तुमची औकात काय? - अजित पवारबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...