युपीत साधूंच्या हत्येप्रकरणावरून संजय राऊतांनी भाजप नेत्यांचे टोचले कान, म्हणाले...

युपीत साधूंच्या हत्येप्रकरणावरून संजय राऊतांनी भाजप नेत्यांचे टोचले कान, म्हणाले...

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात असलेल्या शिव मंदिर परिसरात ही घटना घडली.

  • Share this:

मुंबई, 28 एप्रिल : पालघरमध्ये चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची दगडाने ठेचून हत्या प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मंदिरात घुसून दोन साधूंची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राजकीय नेत्यांना आवाहन केलं आहे.

उत्तर प्रदेशमधील  बुलंदशहरातील अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात असलेल्या शिव मंदिर परिसरात ही घटना घडली.  संजय राऊत यांनी या घटनेबद्दल ट्वीट करून तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. 'उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधूंची हत्या झाली आहे. ही अत्यंत निर्घृण आणि अमानुष अशी ही घटना आहे', अशी प्रतिक्रियाही राऊत यांनी दिली.

तसंच,  सर्व संबंधितांना आवाहन आहे, या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. योगी आदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा करत भाजप नेत्यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

काय आहे प्रकरण?

अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात असलेल्या शिव मंदिर परिसरात 2 साधूंची हत्या करण्यात आली आहे. कंपाऊंड रूममध्ये दोघांचे मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत सापडले. हे दोन्ही साधू शिवमंदिराची देखभाल आणि पुजार्‍याचं काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडील चिमटा नेल्याची तक्रार साधूंनी केली होती. या वादातून काही व्यसनी तरुणांनी त्यांचा खून केला.

हेही वाचा - 'उद्धव ठाकरेंकडे राज्य मोठा भाऊ म्हणून पाहात आहे', सुप्रिया सुळेंकडून कौतुक

या प्रकरणी पोलिसांनी मुरारी नावाच्या तरुणाला अटक केली आहे.  या घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू असून आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन्ही साधूंचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. ते शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. साधूंच्या हत्येची बातमी वाऱ्यासाऱखी परिसरात पसरल्यामुळे घटनास्थळी पोलिसांची आणि लोकांची गर्दी जमा झाली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 28, 2020, 12:38 PM IST

ताज्या बातम्या