मुंबई, 24 मे : राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी अखेरीस कोल्हापूरमधील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे, अशी घोषणाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांचा आदर आहे, पण त्यांनी शिवसेनेची ऑफर नाकारली म्हणून आता आमच्याकडून फाईल बंद झाली, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं.
संभाजीराजे यांना शिवसेना उमेदवारी देणार की नाही, याबद्दल मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेरीस संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली.
'सहावा उमेदवारच कुठे आहे, संजय पवार यांचं नाव फायनल झाले आहे. संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनीच पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणार आहे. पवार हा कोल्हापूरचा मावळा आहे, मावळे असता म्हणून राजे असतात, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
(पुण्यात राहून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात, ATSने मुसक्या आवळल्या)
शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेचा चॅप्टर बंद, आमच्याकडून फाईल बंद झाली आहे. संभाजीराजे यांचा आम्ही आदर ठेवतो, त्यांच्या कुटुंब आणि गादीविषयी कायम आदर ठेवत असतो. सहाव्या जागेसाठी तुम्ही उमेदवार व्हा, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते मैदानात आले आहे, जर कुणाकडे 42 संख्याबळ असेल त्यांनी पाठिंबा द्यावा. संभाजीराजे यांचा विचार करूनच शिवसेनेनं ऑफर दिली होती. शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असा आम्ही प्रस्ताव दिला होता, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
(कधीतरी आमच्या आयुष्यात पण डोकवा..' अमृता खानविलकरनं कुणासाठी जोडले हात?)
शिवसेनेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूनच सेना उमेदवार देणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांना ही संधी दिली जाणार आहे. याआधी संजय पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसंच नगरसेवक ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्यामुळे कोल्हापूरमध्ये नाराजीला सामोरं जावं नाही म्हणून संजय पवार यांना उमेदवारी देऊन संभाजीराजेंना शह देण्याची रणनिती सेनेनं आखली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.