Home /News /mumbai /

राज्यसभा निवडणूक: शिवसेना संभाजीराजेंसाठी अपक्षाला पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी दिलं उत्तर

राज्यसभा निवडणूक: शिवसेना संभाजीराजेंसाठी अपक्षाला पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी दिलं उत्तर

आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार आहे आणि शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार आहेत, असा विश्वास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे

    मुंबई 23 मे : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) अपक्ष उमेदवारीची घोषणा केली. शिवसेनेने संभाजीराजेंना पक्ष प्रवेश आणि उमेदवारीची ऑफर दिली. मात्र ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारली आहे. संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होते. मात्र ही भेट ही त्यांनी रद्द केली. यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे (Sanjay Raut on Rajya Sabha Election). संभाजीराजेंनी खासदारकीची ऑफर नाकारताच शिवसेनेचं पुढचं पाऊल, उद्या जाहीर करणार उमेदवार राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) 42 मतांची तजवीज केली का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, की आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार आहे आणि शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार आहेत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच, आमचा संभाजीराजेंना विरोध नसल्याचंही राऊत म्हणाले. 'शिवसेना अनेक वर्षापासून राजकारणात आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ. शिवसेनेचे स्वत:चे उमेदवार असताना आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा कसा देऊ शकतो? त्यामुळेच आम्ही संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी ते आग्रही आहेत', असं संजय राऊत म्हणाले Breaking News: मुख्यमंत्र्यांसोबतची भेट रद्द, छत्रपती संभाजीराजे वर्षावर जाणार नाही संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते छत्रपती आहेत. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, संभाजीराजेंकडे त्यासाठी आवश्यक मते नाहीत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेकडे आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी केली होती, असंही राऊत म्हणाले. राज्यसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार असतानाही आम्ही दोन पाऊले मागे जाण्यासाठी तयार आहोत. संभाजीराजेंनी एक पाऊल तरी पुढे यावे, असं आवाहनही यावेळी राऊत यांनी केलं. तसंच, याबाबतचा अंतिम निर्णय हा संभाजीराजेंचाच असेल. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार पाहता त्यांनी मतांची बेगमी केली असेल, असंही राऊत म्हणाले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Rajyasabha, Sambhajiraje chhatrapati, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या