मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि संजय राऊत यांच्यात महत्त्वाची बैठक, सोमय्यांच्या अडचणी वाढणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि संजय राऊत यांच्यात महत्त्वाची बैठक, सोमय्यांच्या अडचणी वाढणार?

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत संजय राऊत यांची महत्त्वाची बैठक सुरू, किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार?

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत संजय राऊत यांची महत्त्वाची बैठक सुरू, किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांची वसुली केली आहे. इतकेच नाही तर सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुद्धा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई, 17 फेब्रुवारी : शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) वसुलीचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचंही संजय राऊत यांनी सकाळी म्हटलं. त्यानंतर आता संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून आपण किरीट सोमय्या यांनी केलेल्या घोटाळ्याच्या संदर्भात माहिती देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वर्षा बंगल्यावर खलबतं? संजय राऊत हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी पोहोचताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) हे सुद्धा वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या हे अडणचीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाचा : "अमित शहा आणि फडणवीसांच्या नावावर किरीट सोमय्यांनी कोट्यवधींची वसुली केली" संजय राऊतांचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी काय केला आरोप? संजय राऊत म्हणाले, पवईतील पेरूबाग पासपोली येथे 38 एकरचा भूखंड आहे हा भूखंड सोमय्याने हडपला. पुनर्वसनाच्या नावाखाली 433 बोगस लोकांची घुसखोरी केली. किरीट सोमय्याचे एजंट तेथे आहेत आणि त्यांनी या 433 लोकांची घुसखोरी केली आहे. या पुनर्वसनावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. 433 लोकांकडून एजंटच्या मार्फत 25-25 लाख रुपये घेतले अशी माझी माहिती आहे. या घोटाळ्याच्या संदर्बात माझ्याकडे ट्रकभर कागदपत्र आहेत. तक्रारदार माझ्यासोबत आहेत. 300 कोटींहून अधिक रक्कम जमा केली. किरीट सोमय्या त्यावेळी सांगत होता, देवेंद्र फडणवीस यांना 50 कोटी रुपये द्यायचे आहेत. वाचा : "ईडीची धमकी देत सोमय्यांनी शेकडो कोटी जमवले, ED अधिकाऱ्यालाही 15 कोटी दिले" किरीट सोमय्या याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही वसुली केली आहे. 300 कोटी रुपयांची वसुली फडणवीसांच्या नावाने केली आहे. हा घोटाळा 400 कोटींहून अधिकचा आहे. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सुद्धा शेकडो कोटी गोळा केल्याची प्रकरण माझ्याकडे आली आहेत. आता त्यांच्या बाजुने जे कुणी बोलत आहेत ना त्यांनी बोलू नये नाहीतर उघडे व्हाल तुम्हीही अशा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. माझ्याकडे लोकांनी समोरून येऊन किरीट सोमय्याची 211 प्रकरणांची माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांत किरीट सोमय्याने साडेसात हजार कोटी रुपये वसुल केले आहेत. जशी ईडीच्या नावावर, सीबीआयच्या नावावर वसुली किरीट सोमय्याने केली. तशी सोमय्याने दिल्लीतील मंत्र्यांच्या नावावर वसुली केली आहे. अमित शहा यांच्या नावावरही वसुली केली असा खळबळजनक आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Kirit Somaiya, Sanjay raut, Uddhav thackeray

पुढील बातम्या