त्यांनी शिवसेनेच्या मनातली भावना व्यक्त केली, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

त्यांनी शिवसेनेच्या मनातली भावना व्यक्त केली, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यांचा मग शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. 'मुख्यमंत्र्यांनी शिवसनेच्या मनातील भावना व्यक्त केली.'

  • Share this:

24 आॅक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमधील जाहीर कार्यक्रमात 'स्वार्थी मित्रांपेक्षा दिलदार विरोधक चागंला' असं शरद पवारांना उद्देशून वक्तव्यं केलं. मात्र मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्यं शिवसेनेलाच डिवचण्यासाठी होतं. हे कुणीही सांगण्याची गरज नाहीये.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यांचा मग शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. 'मुख्यमंत्र्यांनी शिवसनेच्या मनातील भावना व्यक्त केली.' असं उत्तर देऊन संजय राऊतांनी शिवसेनेच्या मनातील सल व्यक्त केलीय.

राजकारणात खरं तर कोण कुणाचा क्षत्रू आणि मित्रही नसतो. परिस्थिती आणि गरजेनुसार शत्रू आणि मित्र बनत असतात. त्यामुळे आता भाजप विरुद्ध शिवसेना वाकयुद्धाचे आणखी काय काय परिणाम होतायेत, ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 12:25 PM IST

ताज्या बातम्या