मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /किरीट सोमय्यांमुळे संजय राऊतांना धक्का, द्यावे लागणार 1 हजार रुपये!

किरीट सोमय्यांमुळे संजय राऊतांना धक्का, द्यावे लागणार 1 हजार रुपये!

किरीट सोमय्यांमुळे संजय राऊतांना दणका

किरीट सोमय्यांमुळे संजय राऊतांना दणका

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यमुळे संजय राऊत यांना धक्का बसला आहे. संजय राऊत यांना 1 हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यमुळे संजय राऊत यांना धक्का बसला आहे. संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने दणका दिलाय, कोर्टात हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने राऊतांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती.

संजय राऊत यांनी सामना पेपरमध्ये बातमी छापून मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊतांच्या वकिलांकडून न्यायालयीन कामकाजात गैरहजर राहण्याचा अर्ज करण्यात आला, पण न्यायालयाने हा अर्ज मान्य केला नाही आणि राऊतांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या याचिकेवर आता 10 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

सोमय्यांचे पुन्हा पेडणेकरांवर आरोप

दरम्यान किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले आहेत. बेस्ट ड्रायव्हर आणि कामगारांचा पगार तसंच पीएफ बुडवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा व्यवहार किशोरी पेडणेकर यांच्या कुटुंबाची कंपनी क्रिश कॉर्पोरेटमार्फत झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. याविरोधात किरीट सोमय्या बेस्ट कामगारांसोबत एन.एम.जोशी पोलीस स्टेशन येथे निदर्शनं करणार आहेत.

2020 साली क्रिश कॉर्पोरेट कंपनीने बेस्टच्या बस चालवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. क्रिश कॉर्पोरेट कंपनी पेडणेकर परिवाराची आहे. 50 हजार कर्मचाऱ्यांचा पीएफ कापला आणि 2-4 महिन्यांचा पगार कापला जो पालिकेकडून घेतला होता. संबंधित लोकांवर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. महापौरांनी दबाव आणून सब कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं, त्यांनीच हा फ्रॉड करून दिला, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

First published:
top videos

    Tags: Kirit Somaiya, Sanjay raut