‘पोलिसांवर हात उचलण्याची हिंम्मत होतेच कशी, त्यांना धड शिकवा’ संजय राऊतांचा हल्लाबोल

‘पोलिसांवर हात उचलण्याची हिंम्मत होतेच कशी, त्यांना धड शिकवा’ संजय राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना कंगना राणौतचं नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले, कुठली तरी ऐरी गैरी नटी पोलिसांना माफिया म्हणते आणि ते आपण थंडपणे बघतो हे यापुढे चालणार नाही.

  • Share this:

मुंबई 24 ऑक्टोबर: मुंबईत आणि राज्यात पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पोलिसांवर हल्ले करण्याची हिंम्मत होतेच कशी असा सवाल करत असा हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे असंही ते म्हणाले. लेखक अंबरीश मिश्र यांनी लिहिलेल्या ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे नेते आशिष शेलार उपस्थित होते त्यामुळे कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना कंगना राणौतचं नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले, कुठली तरी ऐरी गैरी नटी पोलिसांना माफिया म्हणते आणि ते आपण थंड पणे बघतो हे यापुढे चालणार नाही.

तर आशिष शेलार म्हणाले, पोलिसांवर असा हल्ला करण्याची हिंमत का होते, याची गंभीर दखल सरकारने घेतली पाहिजे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे. पुस्तकाच्या नावावरून त्यांनी राऊतांना टोलाही लगावला, संजय राऊत यांनी पुस्तकाचं नाव उधळले मोती अस घेतलं, मला काही काळ वाटलं त्यांनी उधळले मोदी असं नाव घेतलं की काय, त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

‘कोरोना’वरच्या उपचारासाठी फडणवीस सरकारी हॉस्पिटलमध्ये; आधीच दिली होती सूचना

सभागृहात व्यासपीठावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे हे एका बाजुला उभे होते. तर शेलार हे काही अंतरावर होते. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला, त्या म्हणाल्या, तुमचं अंतर तेवढंच लांब राहू द्या. आमचं ( संजय राऊत ) अंतर असच राहील.

आपण तिघे( संजय राऊत , सुप्रिया सुळे, आशिष शेलार) एक कार्यक्रम घेऊ या असा प्रस्ताव आशिष शेलार यांनी मांडला, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या तिघांनी कार्यक्रमात यावं यासाठी मला अधिकार नाही, तो मिळेल की नाही ते देखील मला माहित नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 24, 2020, 8:42 PM IST

ताज्या बातम्या