Home /News /mumbai /

हे तर उलट्या खोपडीचे राजकारण, मुंबई लोकलवरून राऊतांची दानवेंवर टीका

हे तर उलट्या खोपडीचे राजकारण, मुंबई लोकलवरून राऊतांची दानवेंवर टीका

मुंबई लोकल (Mumbai Local) 15 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी जाहीर केल्यानंतर आता त्यावरून राजकीय वाद (Political reactions) सुरु झाले आहेत.

    मुंबई, 9 ऑगस्ट : मुंबई लोकल (Mumbai Local) 15 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी जाहीर केल्यानंतर आता त्यावरून राजकीय वाद (Political reactions) सुरु झाले आहेत. राज्य सरकारनं हा निर्णय घेण्यापूर्वी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve, MoS Railway) यांनी दिली होती. त्यावर शिवसेना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रेल्वे ही काय भाजपची खासगी मालमत्ता आहे का, असा सवाल करत दानवेंच्या विधानावर टीका केली आहे. मुंबई लोकल सुरू करण्यासाठी एका ऍपची योजना राज्य सरकारनं आखली असून त्यावर लसीकऱणाचे तपशील भरल्यानंतर प्रवाशांना पास जारी केले जाणार आहेत. मात्र रेल्वे स्टेशनवर या पासवर असणाऱ्या क्युआर कोडच्या स्कॅनिंगचा प्रश्न उभा राहणार आहे. राज्य सरकारनं रेल्वेला या ऍपबाबत माहिती दिली नसल्यामुळे आता क्युआर कोड स्कॅनिंगची व्यवस्था राज्य सरकारनेच करावी, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, काही लोकांना रेल्वे ही राष्ट्राची नव्हे, तर पक्षाची खासगी मालमत्ता असल्याचं वाटतं, अशी टीका त्यांनी केली. मुंबई लोकल सुरु करावी, यासाठी सर्वात मोठं आंदोलन भाजपनं उभं केलं होतं. तातडीने रेल्वे सुरु करा, अशी मागणी दानवे करत होते. आता प्रत्यक्ष लोकल सुरू झाल्या, तर दानवेंची भाषा कशी बदलली, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. हे वाचा -लोकल सुरु करण्याच्या निर्णयावर रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला दणका, म्हणाले... मुंबईत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सामान्यांसाठी मुंबई लोकल बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रभाव ओसरल्यामुळे ती सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचं दानवेंनी सांगितलं होतं. मात्र आता दानवे राजकारण करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हे उलट्या खोपडीचं राजकारण असल्याची टीका राऊत यांनी केलीय.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Mumbai local, Raosaheb Danve, Sanjay Raut (Politician)

    पुढील बातम्या