Home /News /mumbai /

'आमच्या आमदारांचं अपहरण केलं; त्यांच्या जीवाला धोका'; संजय राऊतांचा भाजपवर आरोप

'आमच्या आमदारांचं अपहरण केलं; त्यांच्या जीवाला धोका'; संजय राऊतांचा भाजपवर आरोप

एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. पत्रकार परिषद घेत आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचं म्हटलं आहे.

    मुंबई 21 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक शिवसेना आमदार सध्या सूरतमध्ये आहेत. हे सर्व भाजपच्या संपर्कात असून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत राहायचं नसल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. अशात आता एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. पत्रकार परिषद घेत आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचं म्हटलं आहे. Eknath Shinde : एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार? फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार सुरतच्या हॉटेलमध्ये, एकनाथ शिंदेंची घेतली भेट मुख्यमंत्र्याबद्दल काही गैरसमज झाले असतील तर दूर करता येतील, असंही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान आमदारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरेंनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. "एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेण्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेनेत परत येऊन मुख्यमंत्री बनावं, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिली." मी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी ही भूमिका घेतली होती. वर्षा बंगल्यावर आपल्या खाजगी सहकार्‍यांसोबत केलेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली ही भूमिका बोलून दाखवली . एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही, अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, तसंच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत. शिंदे चर्चा करायला तयार आहेत. पण, सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra politics, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या