संजय राऊत यांनी कंगना रणौतला दिले चॅलेंज, म्हणाले...

संजय राऊत यांनी कंगना रणौतला दिले चॅलेंज, म्हणाले...

'मुंबई पोलिसांवर त्यांनी संशय घेतला. पण आता एम्सने सीबीआयला अहवाल दिला आहे. या अहवालामुळे ती लोकं आता खड्यात पडली आहे'

  • Share this:

 

मुंबई, 05 ऑक्टोबर : 'देशात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कंगना रणौतने आता हाथरस प्रकरणावर बोलले पाहिजे. बलरामपूरमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलले पाहिजे, अशी मागणीवजा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून भाजप आणि कंगना रणौतवर सडकून टीका केली आहे.

' पहिल्यापासून सुशांत प्रकरणात भाजपने बेछुट आरोप केले. मुंबई पोलिसांवर त्यांनी संशय घेतला. पण आता एम्सने सीबीआयला अहवाल दिला आहे. या अहवालामुळे ती लोकं आता खड्यात पडली आहे.' असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

तसंच, 'कंगना राणावत आता कुठे बोलताना काही दिसत नाही.  या नटीने हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर बोलले पाहिजे. बलरामपूरमध्ये झालेल्या घटनेवरही बोलले पाहिजे. कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. तेव्हा काही सामाजिक संघटना पुढे आल्या होत्या. त्या सर्व लोकांना उत्तर प्रदेशला हाथरस इथं पाठवले पाहिजे.  या लोकांना हाथरसचे तिकीट दिले पाहिजे, तिथे कसे जायचे कुठे राहायचे, याची माहिती आपण देणार आहोत', असा टोलाही राऊत यांनी लगावला.

'ठाकरे हा ब्रॅंड आहे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट उधळला गेला. राज्यात ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण आता ज्या लोकांनी हा खड्डा खोदला होता, त्यातही लोकं पडली आहे आणि राज्यातील जनतेनं त्या खड्ड्यात माती टाकून थडगे बांधले आहे', अशी जळजळीत प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

'लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी अनलॉकची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्प्या-टप्प्याने गोष्टी उघडल्या जाणार आहे. राज्यातील एक एक गोष्टी सुरू करण्यात येत आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये 50  टक्के मर्यादा घालता येते. पण मंदिरामध्ये ते शक्य नाही', याबद्दल मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतली, असंही राऊत यांनी सांगितले.

बिहार निवडणूक लढवण्याबद्दल चर्चा सुरू आहे. याबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असून निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही राऊत यांनी दिली.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 2:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या