मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत पडसाद, भाजपसोबत जाण्याबद्दल नेत्यांनी उपस्थिती केले सवाल

राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत पडसाद, भाजपसोबत जाण्याबद्दल नेत्यांनी उपस्थिती केले सवाल

संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक शैलीतून तर कुणाल कामरा हा त्याच्या उपरोधिक कॉमेडीच्या माध्यमातून कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे कायम चर्चेत असतात.

संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक शैलीतून तर कुणाल कामरा हा त्याच्या उपरोधिक कॉमेडीच्या माध्यमातून कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे कायम चर्चेत असतात.

संजय राऊत आणि फडणवीस यांच्या या भेटीमुळे शिवसेनेकडून एका प्रकारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर दबाव टाकण्याचे काम सोप्पे झाले.

    मुंबई, 28 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे शिवसेनेत सुद्धा नाराजीचे सूर उमटले आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भाजपने बदनामी केली आणि त्यांच्याच सोबत परत कशाला जायचे, असा सवाल सेनेच्या नेत्यांनी केला आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचे काही नेते नाराज झाले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी भाजपवर टीका करणारे संजय राऊत यांना याची सुद्धा जाणीव राहिली नाही का? अशी टीकाच काही मंत्र्यांनी केली. कारमध्ये घुसून बाहेर काढलं आणि चाकू-कुऱ्हाडीने बाल्याला संपवलं, नागपूरचा VIDEO संजय राऊत आणि फडणवीस यांच्या या भेटीमुळे शिवसेनेकडून एका प्रकारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर दबाव टाकण्याचे काम सोप्पे झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची तशी दुविधाही पाहण्यास मिळाली. खुद्द शरद पवार यांनीच तातडीने बैठक बोलावून उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केला. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा हजर होते. विशेष म्हणजे, भाजपसोबत पाच वर्ष सत्तेत राहून सेनेला अपमान सहन करावा लागला होता. त्यामुळे सेनेनं भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यामुळे राज्यातील राजकारण आता पूर्णपणे बदलले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सापडला दुसऱ्या महिलेसोबत,घरी आल्यावर पत्नीलाच मारहाण, VIDEO शिवसेनेला भाजपसोबत जाणे हे आता तितके सोपे राहिले नाही. तिन्ही पक्षांमध्ये अत्यंत गुंता वाढला आहे. त्यातच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही चांगले आहे. त्यामुळे भविष्यात जर परिस्थिती बिघडली आणि हे दोन्ही नेतेही एकत्र आले तर शरद पवार यांना हा निर्णय मान्य होईल का? असाही सवाल तेव्हा उपस्थितीत होईल.  पण, अजितदादांनी अशी खेळी केली तरी विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे. त्यामुळे वेगळा गट जरी अजितदादांनी केला तर त्याला मान्यता ही काँग्रेसकडूनच लागणार आहे. त्यामुळे हे गणित वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत राहिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी मतं आपल्याला मिळत नाही. ती जर मिळत असतील तर त्याच शिवसेनेचाच फायदा नाही का, असा सवाल सेनेच्या ज्येष्ठ नेत्याने उपस्थितीत केला. दरम्यान, संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या भेटीबद्दल पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. 'देवेंद्र फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. 'सामना'च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट घेतली होती. गप्पा मारल्या आणि एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे कायमचे शत्रू नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा मानतो' असं राऊतांनी स्पष्ट केले. सेनेसोबत जाणार नाही- फडणवीस दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.  'संजय राऊत यांच्या भेटीमुळे शिवसेनेसोबत अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही' असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. म्हशींनी सिंहाला असा दाखवला इंगा की थेट पळतच सुटला, पाहा VIDEO तसंच, 'महाविकास आघाडी सरकारचे जे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू.  पण सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई भाजपला नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या