नीरव मोदीवरून सेना-भाजपमध्ये चालले ट्विटर बाण

नीरव मोदीवरून सेना-भाजपमध्ये चालले ट्विटर बाण

एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना-भाजप पुन्हा एकदा नीरव मोदीवरून ट्विटरवरून भांडताहेत.

  • Share this:

17 फेब्रुवारी : एकीकडे नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेचे हजारो कोटी बुडवून जगाच्या एका कोपऱ्यात सुखात आहे तर देशात मात्र त्यावरून राजकारण तापलं आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना-भाजप पुन्हा एकदा नीरव मोदीवरून ट्विटरवरून भांडताहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी या आडनावाबाबत भाजप सरकारवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणतात, 'ललित मोदी, नीरव मोदी दोघेही देशाबाहेर पळून गेले. तिसरा मोदी येऊन-जाऊन असतो.'

मात्र त्यावरून मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या या टीकेला कावळ्याची उपमा दिली आहे.

शेलार म्हणतात, 'मोदी शब्दाचे यमक जुळवून प्रभादेवीच्या गल्लीत बसलेल्या कावळ्यांना टुकार काव्य सुचलं..तेव्हा कळलं की शिमगा जवळ आला आहे. तसा शिमगा वर्षभरच असतो. उगाच यमकासाठी कशाला सूर्यावर थुंकता..ती थुंकी तुमच्या तोंडावरच पडू नये म्हणजे झालं.

 

First published: February 17, 2018, 12:34 PM IST

ताज्या बातम्या