मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

संजय राऊत - आशिष शेलारांमध्ये गुप्त भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

संजय राऊत - आशिष शेलारांमध्ये गुप्त भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2021/07/raut-vs-shelar1.jpg

http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2021/07/raut-vs-shelar1.jpg

Sanjay Raut Ashish Shelar meeting: भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई, 3 जुलै : शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली आणि तेव्हापासून भाजप-शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी भाजपसोबत पुन्हा जुळवून घेण्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांच्यात गुप्त भेट झाली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मुंबईतील नरिमन पॉईंट (Nariman Point Mumbai) परिसरात संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारपासून सुरू होत असलेलं राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आणि राजकीय संघर्ष याच्या पार्श्वभूमीवर या भेटीवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या गुप्त भेटीवर न्यूज 18 लोकमतने संजय राऊत यांना विचारले आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

चंद्रकांत पाटील नवा लेटरबॉम्ब टाकणार, आता कोण अडकणार?

गुप्त भेटीच्या वृत्तावर काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांची मुंबईतील नरिमन पाँईट येथील मेकर चेंबर बिल्डिंगमध्ये भेट झाल्याचं वृत्त समोर आलं. मात्र अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. मेकर चेंबर बिल्डिंग ही राजकिय कार्यालय असलेली बिल्डिंग नाहीये. तेथे सर्व कमर्शियल आँफिसेस आहेत. मी माझ्या मित्राला तीथे भेटायला गलो होतो. त्याच बिल्डिंगमध्ये आशिष शेलार कुणाला भेटायला आले असतील तर मला त्यासंबंधी काहीच माहिती नाही. ते तुम्ही त्यांनाच विचारा. आशिष शेलार यांनीही अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगितलंय. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार ही अराजकीय वैयक्तिक भेट असू शकते. त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही.

आशिष शेलार म्हणाले....

संजय राऊत यांच्यासोबत गुप्त भेट झाल्याच्या वृत्तावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशी भेट झाली नाही, झाली तर लापावणार नाही अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.

First published:

Tags: Ashish shelar, Mumbai, Sanjay raut