मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Sanjay Raut vs Kirit Somaiya: "ईडीची धमकी देत सोमय्यांनी शेकडो कोटी गोळा केले, ED अधिकाऱ्यालाही 15 कोटी दिले" संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut vs Kirit Somaiya: "ईडीची धमकी देत सोमय्यांनी शेकडो कोटी गोळा केले, ED अधिकाऱ्यालाही 15 कोटी दिले" संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut vs Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला. त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार करत खळबळजनक आरोप केला आहे.

  • Published by:  Sunil Desale
विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 16 फेब्रुवारी : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांसह भाजप नेत्यांवर अनेक आरोप केले. त्यानंतर आज सकाळी किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राऊतांना प्रत्युत्तर दिलं. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद संपते ना संपते लगेचच संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर वसुलीचा खळबळजनक आरोप (serious allegation) केला आहे. ईडीच्या नावाने धमकावून कोट्यवधी जमवले संजय राऊत म्हणाले, मुंबईतील बिल्डर मुंबईतील व्यापारी यांच्याकडून ईडीच्या नावाने धमक्या देऊन या किरीट सोमय्याने आतापर्यंत शेकडो कोटी जमा केले आहेत. 8 jvpd स्कीम, सुजीत नवाब नावाचा एक प्लॉट आहे. तो प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई बिल्डर या दोघांनी मुळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटी रुपयांचा प्लॉट त्याहूनही अधिक जास्त किमतीचा प्लॉट मातीमोल भावाने अमित देसाईंच्या नावाने करून घेतला. 15 कोटी ईडीच्या अधिकाऱ्याला दिले ईडीची धमकी देऊन हा प्लॉट आपल्या नावे करून घेतला आहे आणि त्यातले पंधरा कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी कोणत्या ईडी अधिकाऱ्याला नेऊन दिले हे स्पष्ट करावं ईडीने... नाहीतर मी त्या अधिकाऱ्याचं नाव घेईल असंही संजय राऊत म्हणाले. वाचा : किरीट सोमय्या म्हणतात, "जोड्याने मारण्यासाठी माझा जोडा संजय राऊतांच्या हातात देतो पण त्यांनी...." बाप बेटे जेलमध्ये जाणार मी तुम्हाला काय सांगितलं भाजप पक्षाचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार, तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेल, जसे जसे ते आतमध्ये जातील तसे तसे तुम्ही मोजत जा. बाप बेटे नक्की जेलमध्ये जाणार, बाप बेटे 100% जेलमध्ये जात आहेत. दुसऱ्याला जेलमध्ये घालवायचे धमक्या देतात आता तुम्ही जा असंही संजय राऊत म्हणाले. वाचा : संजय राऊत यांच्यावर किरीट सोमय्यांचा पलटवार, "उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल तर.." 19 बंगले कुठे आहेत दाखवा ना? किरीट सोमय्या हा इन्वेस्टगेटिव्ह अथॉरिटी नाही. भाजप आणि सांगावं किरीट सोमय्या हा जबाबदार माणूस आहे आणि त्याच्या आरोपाची आम्ही सहमत आहोत. मला कागद वगैरे काही सांगू नका, बंगले आहेत की नाही हे सांगा ? मी आव्हान दिले ना... 19 बंगले कुठे आहेत ते दाखवा. देवस्थानच्या जमिनी कुठे आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. अमोल काळे कुठेय? एक दूधवाला महाराष्ट्र येतो, या ठिकाणच्या सरकारमधील काही नेत्यांचे पैसे आपले धंद्यात गुंतवतो आणि सात हजार कोटींचा मालक होतो. माझा प्रश्न आहे, अमोल काळे कुठे? नाहीतर आम्ही समोर आणू.... अमोल काळे सोबत व्यवहार काय ? सुरुवात त्यांनी केली आहे शेवट आम्ही करणार असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.
First published:

Tags: Kirit Somaiya, Sanjay raut, Shiv sena

पुढील बातम्या