बाळासाहेब ठाकरे स्मारक कार्यक्रमाला संजय राऊत गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण

बाळासाहेब ठाकरे स्मारक कार्यक्रमाला संजय राऊत गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण

अलीकडे भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत राऊत यांनी वारंवार वादग्रस्त विधान केली होतीयय

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने महापौर बंगल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्मारकाचं गणेशपूजन करण्यात आलं आहे. परंतु, या कार्यक्रमापासून सेनेचे खासदार संजय राऊत यांना दूर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

आज मुंबईतील महापौर बंगल्यात मोठ्या जल्लोषात बाळासाहेबांच्या स्मारकाचं गणेशपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे दोन नेते एकत्र आले होते. यावेळी इतरही आमदार आणि मंत्री उपस्थित होते. पण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या चर्चेवेळी इतर सर्वजण बाहेरच थांबले होते. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पुनम महाजन, मुंबईचे महापौर महाडेश्वर, केंद्रीय मंत्री अनंत गिते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, मनोहर जोशी, शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे, आणि ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.

...म्हणून संजय राऊत गैरहजर

परंतु, या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत गैरहजर होते. संजय राऊत या कार्यक्रमाला उपस्थित नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अलीकडे युतीबाबत राऊत यांनी वारंवार वादग्रस्त विधान केली होती. त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं, अशी चर्चा रंगली आहे.

मानपमान नाट्य

दरम्यान, मुंबईतील महापौर बंगल्याची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे हस्तांतरण कार्यक्रमात मानपमान नाट्य पहायला मिळालं. या हस्तांतरण कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपचे अनेक मंत्री आले होते. मात्र, महापौर बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारवरच शिवसेना नेत्यांच्या, मंत्र्यांच्या आणि खासदारांच्या गाड्या अडवल्या गेल्याचा प्रकार घडला. त्यामुळे सेनेच्या नेत्यांना चालतच कार्यक्रमस्थळी पोहोचावं लागले. तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांना आणि खासदारांना मात्र पोलीस मुख्य प्रवेशद्वारातून कारने आतमध्ये सोडण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री आणि खासदारांमध्ये नाराजी पसरली.

================================

First published: January 23, 2019, 5:03 PM IST

ताज्या बातम्या