मोठी बातमी, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला संजय राठोड गैरहजर

मोठी बातमी, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला संजय राठोड गैरहजर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या  प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला संजय राठोड गैरहजर आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा   बंगल्यावर बैठक सुरू झाली आहे. मात्र या बैठकीला वनमंत्री संजय राठोड गैरहजर असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेची पॉवरफूल बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच पॉवरफूल बैठक आहे

. या बैठकीत राज्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळवले आहे. आता सरपंच निवडणूक आणि राज्यातील पाच महानगरपालिकांच्या प्रलंबित निवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनेची रणनिती ही या बैठकीत ठरू शकते.

मात्र, या बैठकीत सर्वांचं लक्ष असणार आहे ते सध्या वादात सापडलेले आणि गेले काही दिवस अज्ञात वासात असलेले वनमंत्री संजय राठोड उपस्थित रहाणार का? याकडेच. पण संजय राठोड हे बैठकीला गैरहजर राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

दरम्यान, संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला असल्याचा दावा भाजपने केला आहे.

याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हा विषय राज्य सरकारचा आहे. या प्रकरणावर राज्य सरकारचे मंत्री निर्णय घेतील. संजय राठोड हे सेनेचे प्रमुख मंत्री आहेत, शिवसेनेचा विदर्भातला चेहरा आहे. त्यांच्यावर जे काही आरोप झाले आहे, त्याबद्दल आधीच मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी आता राजीनामा दिला आहे की नाही, याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

Published by: sachin Salve
First published: February 16, 2021, 1:03 PM IST

ताज्या बातम्या