Home /News /mumbai /

'संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री पवारांच्या सूचनेनंतर निर्णय घेतील'; नारायण राणेंचा खोचक टोला

'संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री पवारांच्या सूचनेनंतर निर्णय घेतील'; नारायण राणेंचा खोचक टोला

कोरोनाबरोबरच संजय राठोड प्रकरणावरुन विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला जात आहे.

    सिंधुदुर्ग, 24 फेब्रुवारी : कोरोनाबरोबरच संजय राठोड प्रकरणावरुन विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला जात आहे. शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड प्रकरणावरुन गेल्या अनेक दिवसात विविध भाजप नेत्यांनी तोफ डागली आहे. आता भाजप नेते नारायण राणे यांनीही पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोडांवरुन ठाकरे सरकारवर घेराव घातला आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान ते म्हणाले की, पुजा चव्हाण हिची आत्महत्या झाली की खून हे अजून समजलेलं नाही. संजय राठोड हे पंधरा दिवस फरार असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सरकार अशा लोकांना पाठीशी घालत आहे. शरद पवारांच्या कृपेने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे संजय राठोड प्रकरणावर ते शरद पवारंच ऐकतील, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. पुढे ते म्हणाले की, राज्य सरकारला अधिवेशन घ्यायचं नाही म्हणूनच कोरोनाचा बावू केला जात आहे. कोरोना हाताळण्यासाठी उपाय योजना केल्या नाहीत. आरोग्य विभाग अतिशय कमकूवत असून महाराष्ट्र आरोग्याची दयनीय अवस्था झाली आहे. परत कोरोना वाढत असेल तर त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. हे सरकार निष्क्रिय ठरलं आहे. हे ही वाचा-IDEO: संजय राठोडांच्या शक्तीप्रदर्शनावर राजकीय वर्तुळातून नाराजी Tiktok स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात नाव आल्यानंतर पहिल्यांदाच वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांची बाजू मंगळवारी मांडली. पोहरादेवी दर्शनाच्या निमित्ताने ते 15 दिवसांनी प्रथमच माध्यमांसमोर आले. या प्रकरणी अकारण गोवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला असतानाच आणखी एक ऑडिओ लीक झाला आहे. तो आवाज विलास चव्हाणचा असल्याचे समोर आले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Narayan rane, Sindhudurg

    पुढील बातम्या