Home /News /mumbai /

शिवसेनेत चाललंय काय? काल 'वर्षा'वर असलेले आमदार आता शिंदेंना भेटायला गुवाहाटीमध्ये!

शिवसेनेत चाललंय काय? काल 'वर्षा'वर असलेले आमदार आता शिंदेंना भेटायला गुवाहाटीमध्ये!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली होती. त्यावेळी संजय राठोड हे वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते

    मुंबई, 22 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मोठे अडचणीत सापडले आहे.एक एक करून आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळत आहे. विशेष म्हणजे, शिंदे गुवाहाटी इथं पोहोचल्यानंतर राज्यातून दोन आमदार तिथे पोहोचले आहे. गमंत म्हणजे, सोमवारी वर्षा बंगल्यावर असलेले आमदार संजय राठोड हे आज गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी आमदार येणार असा दावा केला होता. त्यांचा हा दावा आता खरा ठरला आहे. गुवाहाटी विमानतळावर आणखी २ सेनेचे आमदार एकनाथ शिंदेंचा तंबूत पोहोचला आहे. आमदार योगेश रामदास कदम हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्यापाठोपाठ संजय राठोड सुद्धा दाखल झाले आहे. संजय राठोड हे माजी वनमंत्री राहिले होते. त्यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला होता. सोमवारी जेव्हा एकनाथ शिंदे सुरतमध्ये आमदारांना घेऊन होते,तर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली होती. त्यावेळी संजय राठोड हे वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्यानंतर आज सकाळी लगेच संजय राठोड हे गुवाहाटीला रवाना झाले आहे. दरम्यान, गुवाहाटी विमानतळावर भाजप आणि सेनेचे काही जण योगेश कदम यांना घेण्यासाठी थांबलेले आहे. तर त्यांच्यासोबत संजय राठोड हे सुद्धा पोहोचले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गटाची ताकद आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्यांना रसद पुरवण्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर झाला होता. त्यानंतर रामदास कदम हे विधान परिषदेतून निवृत्त झाले होते. पण, सेनेनं त्यांना संधी दिली नाही. योगेश कदम यांनाही पक्षाने डावललं होतं. अधूनमधून योगेश कदम हे शिवसेनेला घरचा अहेर देत होते. आता योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहे. दरम्यान,'आम्ही 40 आमदार सोबत आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत' असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 'उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. मिलिंद नार्वेकर आले होते, त्यांना मी भेटलो. तुम्ही एकीकडे माणसं बोलण्यासाठी पाठवली आहे आणि दुसरीकडे मला गटनेतेपदावरून हटवलं. माझे पुतळे जाळले जात आहे. मी याआधी सुद्धा उद्धव ठाकरे यांना आमदारांची भूमिका समजावून सांगितली होती. पण बोलणी सुरु असताना मला गटनेतेपदावरून हटवलं. त्यामुळे मी आमदारांशी बोलून पुढील निर्णय घेईल असं सांगितलं, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं. मी आजही बाळासाहेबाचा कट्टर शिवसैनिक आहे, शिवसैनिक राहणार आहे. आनंद दिघे यांचे विचार आणि प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. काल आज आणि उद्या आम्ही शिवसैनिकच असणार आहोत. आमची सुरुवात ही हिंदुत्वाची होती. यात कोणतीही तडजोड करणार नाही., आम्ही कोणत्याही आमदारांना जोरजबरदस्तीने आले नाही. स्वखुशीने हे आमदार आले आहे. 40 पेक्षा जास्तीचे आमदार आज माझ्यासोबत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आली आहे,असं एकनाथ शिंदे म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Maharashtra politics, Shiv sena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या