S M L

मुंबई कुणाची? संजय निरुपम VS गजाजन कीर्तिकर, उत्तर - पश्चिम मुंबई कोण जिंकणार?

ऐन निवडणुकीत संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झालेली हकालपट्टी आणि त्यांचा बदललेला मतदारसंघ यामुळे ते चर्चेत राहिले. त्यांची लढत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांच्याशी आहे.

Updated On: Apr 25, 2019 09:38 PM IST

मुंबई कुणाची? संजय निरुपम VS गजाजन कीर्तिकर, उत्तर - पश्चिम मुंबई कोण जिंकणार?

विवेक कुलकर्णी

मुंबई, 25 एप्रिल : ऐन निवडणुकीत संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झालेली हकालपट्टी आणि त्यांचा बदललेला मतदारसंघ यामुळे ते चर्चेत राहिले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष की उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेची उमेदवारी यापैकी त्यांनी उमेदवारीचा पर्याय निवडला. त्यांच्याऐवजी मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून रिंगणात उतरवण्यामध्ये संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निमित्तानेही सगळ्यांसमोर आले.


काँग्रेसमध्ये गटबाजी

अंधेरीसारख्या हिंदीभाषक मतदारांच्या उपनगरात संजय निरुपम यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो पण काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी त्यांच्याविरोधात जाऊ शकते. या मतदारसंघात मराठी मतदारांचीही संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना त्याचा फायदा मिळू शकतो. गजानन कीर्तीकर आपला मतदारसंघ राखणार का याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेची संघटनात्मक ताकद ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

चुरशीच्या लढती

Loading...

दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान भाजपसमोर आहे.

मनसे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालातच कळेल. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

=======================================================================================

VIDEO : विखे पाटील पक्षात असतील की नाही? अशोक चव्हाण म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 09:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close