मनसेसैनिकांनी मारलं तर फेरीवालेही मारतील, संजय निरुपमांची मनसेला धमकी

मनसेसैनिकांनी मारलं तर फेरीवालेही मारतील, संजय निरुपमांची मनसेला धमकी

"मागील वीस वर्षांपासून हे फेरीवाले आपला व्यवसाय करत आहेत. मात्र मनसे यासाठी राजकारण करत आहे"

  • Share this:

 25 आॅक्टोबर : फेरीवाल्यांवर जर मनसैनिकांनी हल्ला केला तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ असं आव्हानच काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी मनसेला दिलंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांना धमक्या देत असून काही ठिकाणी त्यांना मारहाण करत आहेत. या फेरीवाल्यांच्या मागे काँग्रेस पक्ष आपली ताकत उभी करत आहे. आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी कांदिवली पूर्व ठाकुर्ली रोड इथं फेरीवाल्यांची भेट घेतली.

मागील वीस वर्षांपासून हे फेरीवाले आपला व्यवसाय करत आहेत. मात्र मनसे यासाठी राजकारण करत आहे. फेरीवाल्यांनी घाबरून न जाता आपला व्यवसाय करावा अशी भूमिका निरुपम यांनी यावेळी फेरीवाल्यांसमोर मांडली.

छट पुजेचा कार्यक्रम यावर्षी ही आपण मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचं ही निरुपम यांनी सांगितलं. यामुळे येत्या काळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 08:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading