मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न होतोय- संजय निरुपम

मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न होतोय- संजय निरुपम

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता लक्षात घेत, निरूपम याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जून : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता लक्षात घेत, निरूपम याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी निरूपम यांच्या बाहेर बंदोबस्त ठेवलाय यास निरूपम यांनी हरकत घेतली आहे. मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप त्यांनी केलाय.

न्यूज18लोकमतशी बोलताना संजय निरुपम म्हणाले, 'मलाही पोलीस का आहेत हे नक्की माहीत नाही. मला आंदोलन करायचं असेल तर मी करेन. पोलिसांना कळणारही नाही. '

ते म्हणाले, पोलिसांना असं माझ्या मागे ठेवणं हे लोकशाहीच्या विरोधी आहे. सरकारनं पोलिसांचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा, असंही ते म्हणाले.

भाजपाध्यक्ष अमित मोदी मुंबईत असताना निरुपम यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवल्याबद्दल राजकीय वर्तृळात चर्चा सुरू आहे.

First published: June 6, 2018, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading