मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

संजय निरुपम आणि मिलिंद देवरांमध्ये या मुद्यावर पेटला वाद

संजय निरुपम आणि मिलिंद देवरांमध्ये या मुद्यावर पेटला वाद

'एका प्रदेशाध्यक्षाऐवजी तीन सदस्यांची नियुक्ती करणं योग्य नाही. त्यामुळे घोळ जास्त वाढेल.'

'एका प्रदेशाध्यक्षाऐवजी तीन सदस्यांची नियुक्ती करणं योग्य नाही. त्यामुळे घोळ जास्त वाढेल.'

'एका प्रदेशाध्यक्षाऐवजी तीन सदस्यांची नियुक्ती करणं योग्य नाही. त्यामुळे घोळ जास्त वाढेल.'

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 7 जुलै : राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर आता अन्य नेतेही राजीनामा देताहेत. मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत मुंबई काँग्रेसचं कामकाज चालविण्यासाठी तीन सदस्यांची नियुक्ती करावी असं सूचवलं होतं. मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी देवरांच्या सूचनेला विरोध केलाय. एका प्रदेशाध्यक्षाऐवजी तीन सदस्यांची नियुक्ती करणं योग्य नसल्याचं निरुपम यांनी म्हटलंय.

निरुपम आणि देवरा यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे. निरुपम हे एकाधिकारशाही करतात असा आरोप करत मुंबईतल्या अनेक नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर वाद शमविण्यासाठी मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही मुंबई काँग्रेसमधला वाद सुरुच असल्याचं स्पष्ट झालंय.

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशात देखील सरकार धोक्यात?

मिलिंद देवरांचा राजीनामा

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.

गांगुलीच्या धाडसी निर्णयानं धोनीचं नशीबच बदललं; पाहा काय झालं होतं!

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी मिलिंद देवरा हे दिल्लीत जाऊ शकतात. राजीनाम्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात काँग्रेससाठी भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीच्या प्रभाव असं दुहेरी आव्हान काँग्रेससमोर निर्माण झालं आहे. देवरा यांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, 26 जून रोजी मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांना दिल्लीत भेटल्यानंतर त्यांनी लवकरच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस हायकमांडनं संजय निरुपम यांची उचलबांगडी करत मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्या खांद्यावर सोपवली होते. मिलिंद देवरा यांनी स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या जागेवर शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला.

First published:

Tags: Milind deora, Sanjay nirupam