संजय निरुपमांचा सरकारवर टोईंग घोटाळ्याचा आरोप,प्रवीण दराडेंवर निशाणा

संजय निरुपमांचा सरकारवर टोईंग घोटाळ्याचा आरोप,प्रवीण दराडेंवर निशाणा

यासाठी ८० हायड्रोलिक मशिन वापरल्या जात असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय

  • Share this:

17 नोव्हेंबर : मुंबईमध्ये गाड्या उचलून नेण्यासाठी टोईंगमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. यासाठी ८० हायड्रोलिक मशिन वापरल्या जात असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय. तसंच आयएएस अधिकारी प्रवीण दराडे यांचे या घोटाळ्याशी लागेबांधे आहे असा आरोपही निरुपम यांनी केला.

सध्या दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये टोईंग कंपन्या बेदरकारपणे गाड्या टो करत आहेत. विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला टोईंगचं काम मिळालंय. टोईंगचा दंड १५० वरुन ६६० का करण्यात आला? प्रत्येक टोईंगमध्ये ४०० हून अधिक पैश्यांचा फायदा या कंपनीला मिळतो. जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आहेत. तेव्हापासून विदर्भ इन्फोटेकला १० कामं मिळाली आहेत असा आरोप निरुपम यांनी केलाय.

तसंच यामध्ये मुख्यमंत्री आपले अधिकारी प्रवीण दराडे यांच्याकडून हे काम करतात. ते अधिकारी जिथे जातात तिथे कंपनी बनवून कंत्राटं मिळवतात असा आरोपही निरुपम यांनी केलाय.

तर मुख्यमंत्री कार्यालयाने निरूपम यांना प्रत्युत्तर दिलंय.  या संपूर्ण प्रक्रियेशी मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रवीण दराडे यांचा काहीही संबंध नाही. वस्तुत: मुंबईतील खाजगी टोईंग व्हॅन प्रणालीचे कंत्राट देण्याची संपूर्ण कारवाई सहआयुक्त, मुंबई वाहतूक पोलिसांच्या पातळीवरच निश्चित करण्यात आली. यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी केपीएमजी या संस्थेची टेक्निकल कन्सलटिंग एजन्सी म्हणून नियुक्ती केली होती. या संस्थेने अल्ट्रा मॉर्डन हायड्रॉलिक क्रेन्ससाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) तयार करून दिले आणि त्याआधारावरच मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-टेंडरिंगची प्रक्रिया राबविली. एकाच दरावर सर्वाधिक कमी 7 वर्षाचा कालावधी हा या कंपनीने नमूद केल्याने त्यांना हे काम दि. 27 मे 2016 रोजी देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 08:01 PM IST

ताज्या बातम्या