माझ्यावर गुन्हा दाखल करण्यामागे सेना-भाजप- संजय निरूपम

मारहाणीत जखमी झाल्याबद्दल मला दुःख वाटतं असं म्हणतानाच मनसेच्या गुंडांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 29, 2017 06:17 PM IST

माझ्यावर गुन्हा दाखल करण्यामागे सेना-भाजप- संजय निरूपम

मुंबई,29 ऑक्टोबर: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांची परवानगी न घेता निरुपम यांनी शुक्रवारी फेरीवाल्यांची रॅली काढली होती. त्यामुळे त्यांच्यावर बेकायदेशीररित्या जमाव करणे हा गुन्हाही दाखल केला आहे. तर या कारवाई मागे भाजप शिवसेनेचा हात असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.

मनसैनिकांनी काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई केली होती. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे तर फेरीवाल्यांच्या पाठिशी निरूपम खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी काढलेल्या आंदोलनाबद्दल त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल विचारले असता मारहाणीत जखमी झाल्याबद्दल मला दुःख वाटतं असं म्हणतानाच मनसेच्या गुंडांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

एकंदरच फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची चिन्हं दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2017 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close