उरली-सुरली काँग्रेस वाचवायची असेल तर निरुपमांना आवारा-नितेश राणे

उरली-सुरली काँग्रेस वाचवायची असेल तर निरुपमांना आवारा-नितेश राणे

नितेश राणे यांनी उरली सुरली काँग्रेस वाचवायची असेल तर संजय निरुपम यांना समज द्या अशी मागणी केलीये.

  • Share this:

30 आॅक्टोबर : मनसेच्या फेरीवाले आंदोलनावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. आज काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी 'उरली सुरली काँग्रेस वाचवायची असेल तर संजय निरुपम यांना समज द्या' अशी मागणी केलीये.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे काँग्रेसच्या विरोधी भूमिका घेत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे मुंबईकरांना त्रास होतोय आणि निरुपम फेरीवाल्यांना पाठीशी घालताहेत असं विधान नितेश राणे यांनी केलंय. स्वतःच्याच पक्षाबद्दल निरुपम यांच्या मनात काय भूमिका हे यावरून दिसतेय. ज्या पक्षाने मला तिकीट दिलं, ज्या पक्षात ते स्वतः आहेत. त्याबद्दल निरुपम असं बोलताहेत हे गंभीर आहे. उरली सुरली काँग्रसं वाचवायची असेल तर काँग्रेसच्या वरिष्ठांनी संजय निरुपम यांना समज द्यावी अशी मागणीच  नितेश राणे यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 08:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading