संजय दत्तला एकाचवेळी पॅरोल आणि फर्लो मंजूर कसे?, कोर्टाचा सरकारला सवाल

काही महिन्यातच त्याचं वर्तन चांगलं होतं हे कसं काय कळलं, हे कळण्याचे निकष ते सांगा असंही कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं आहे.

Sachin Salve | Updated On: Jul 27, 2017 06:43 PM IST

संजय दत्तला एकाचवेळी पॅरोल आणि फर्लो मंजूर कसे?, कोर्टाचा सरकारला सवाल

विवेक कुलकर्णी, मुंबई

27 जुलै : अभिनेता संजय दत्तनं एकाच वेळी पॅरोल आणि फरलो अर्ज केल्यानंतर त्याला दोन्ही एकाच वेळी मंजूर कसे काय करण्यात आले असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. संजय दत्त येरवडा तुरुंगात शरण आल्यानंतर काही महिन्यातच त्याचं वर्तन चांगलं होतं हे कसं काय कळलं, हे कळण्याचे निकष ते सांगा असंही कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं आहे.

या गोष्टींचा खुलासा राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे करावा असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. एखादा कैदी जेव्हा घरातील व्यक्ती आजारी आहे म्हणून पॅरोलचा अर्ज करतो त्यावेळी ती आजारी व्यक्ती मरणासन्न आहे का इतपर्यंत विचारणा केली जात असताना संजय दत्तला त्याचं अपत्य आजारी असल्याकरता पॅरोल मिळाल्यानंतर परत लगेच तीन महिन्यांनी तशाच काही कारणासाठी बाहेर येण्याची परवानगी कशी काय दिली जाते असा सवालही कोर्टाने केला आहे.

संजय दत्त हा परत जेलमध्ये जावा असं आम्ही म्हणत नाही पण पॅरोल आणि फरलो देण्याचे निकष काय हे स्पष्ट झाले पाहिजे असंही कोर्टाने म्हटलं आहे. सरकारनं याबद्दलचं प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यात द्यावं असा आदेश कोर्टाने दिला आहे. संजय दत्तच्या निमित्ताने कैद्यांना पॅरोल आणि फरलो मिळण्याचा असा चुकीचा पायंडा पडू नये अशी आमची इच्छा असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close