S M L

शेतकऱ्यांना शिव्या देणाऱ्या अधिकाऱ्याला मनसेचा दणका, संदीप देशपांडेंनी फोनवर झापलं

मुंबईत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर आपला माल फेकून आंदोलन केलं होतं.

Sachin Salve | Updated On: Apr 14, 2018 08:56 PM IST

शेतकऱ्यांना शिव्या देणाऱ्या अधिकाऱ्याला मनसेचा दणका, संदीप देशपांडेंनी फोनवर झापलं

मुंबई, 14 एप्रिल : मंत्रालयाबाहेर भाजीपाला फेकणाऱ्या शेतकऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्याला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी जशाच तशा भाषेत उत्तर दिलं. संदीप देशपांडे आणि मुंबई पालिकेचे अधिकारी आकरे यांचा आॅडिओ काॅल व्हायरल झालाय.

मुंबईत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर आपला माल फेकून आंदोलन केलं होतं. महापालिका अधिकारी जाणूनबुजून त्रास देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

आज या शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करू नका, पण इतर ठिकाणी बिनधास्त व्यवसाय करा मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं आहे.

तर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडेही काही शेतकऱ्यांनी तक्रार केली की महापालिका अधिकारी आम्हाला दम देतात, शिवीगाळ करतात. त्यावर देशपांडे यांनी फोन करून त्या अधिकाऱ्याला दमबाजी केली.

संदीप देशपांडेनी अधिकाऱ्याला कसा दम दिला ?

Loading...
Loading...

संदीप देशपांडे - संदीप देशपांडे बोलतोय, आकरे का?

आकरे - सर नमस्कार, बोला..

संदीप - अहो शेतकऱ्यांना शिव्या देताना लाज नाही का वाटत तुम्हाला आकरे साहेब? हॅलो. तुमच्याशी बोलतोय...अहो शेतकऱ्याना शिव्या देता तुम्हाला लाज नाही वाटत?...

आकरे --सर मी ट्रेनमध्ये आहे, तुम्हाला उतरल्यावर फोन करू का...मला काहीच ऐकू येत नाही..आणि ही बातमी खोटी आहे.

संदीप देशपांडे - खोटी काय तो शेतकरी माझ्यासमोर उभा आहे..खोटी बातमी काय बोलता तुम्ही? याच्यापुढे शेतकऱ्यांना हात लागेल तर माझ्याशी गाठ आहे..संदीप देशपांडेशी.. मी येतोय सोमवारी धंदा लावायला.. कुणाच्या ***** दम आहे तर त्यांना उचलायला सांगा.

आकरे - साहेब उलट आपण आपल्या पक्षातर्फे त्यांना लावून दिलाय ठाकूर व्हिलेजमध्ये..

संदीप देशपांडे - तिथं जे धंदा लावतात, भय्ये नाही पाहिजे, आमचे शेतकरी बसले पाहिजेत.. त्यांना हात लावला ना तर संदीप देशपांडेशी गाठ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2018 08:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close