S M L

"तेव्हा तिजोरी उघडी होती,निदान आज चोरीची वेळ आली नसती"

2017मध्ये आम्ही तिजोरी उघडी करून दिली होती जर तेव्हा पैसे घेतले असते तर आज चोरी करण्याची वेळ आली नसती अशी टीका मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली.

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2017 09:15 PM IST

13 आॅक्टोबर : ज्यांना वाटतं शिवसेना आणि मनसे एकत्र यावं त्यांना शिवसेनेचा खरा चेहरा आज दिसलाय. 2017मध्ये आम्ही तिजोरी उघडी करून दिली होती जर तेव्हा पैसे घेतले असते तर आज चोरी करण्याची वेळ आली नसती अशी टीका मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली.

शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक फोडले आणि शिवबंधनात अडकले. यावर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

आमिष आणि प्रलोभनं दाखवून सामनामध्ये अग्रलेख लिहिलाय. आणि दुपारी विसरला एवढी दुटप्पी भूमिका होऊ शकत नाही.


2017 मध्ये मनसेनं जेव्हा भाजपचा महापौर बसू नये असा प्रस्ताव दिला होता. तेव्हा पूर्ण तिजोरी उघडी करून दिली होती. तेव्हा जर पैसे घेतले असते तर आज चोरी करण्याची गरज पडली नसती असा टोला देशपांडे यांनी लगावला.

तसंच ज्या नगरसेवकांसाठी मनसैनिकांनी जीवाचं रान करून निवडून दिलं. मनसेनं लोकांवर विश्वास ठेवला होता त्यांचा हा विश्वासघात आहे. आज नगरसेवकांना कोट्यवधीची आश्वासनं दिली त्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे केली आहे त्याची चौकशी होई द्या अशी मागणीही देशपांडेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 09:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close