कमला मिल आग प्रकरणी दबाव आणणारा सत्ताधारी नेता की विरोधी पक्षातला भैया?-संदीप देशपांडे

कमला मिल आग प्रकरणी दबाव आणणारा सत्ताधारी नेता की विरोधी पक्षातला भैया?-संदीप देशपांडे

कमला मिल कंपाऊंड आगी प्रकरणी संदीप देशापांडे यांनी ट्विट केलंय. कमला मिलवर कारवाई न करण्यासाठी आयुक्तांना कोणाचा फोन आला होता असं देशपांडेनी प्रश्न उपस्थित केला .

  • Share this:

06 जानेवारी : कमला मिल कंपाऊंड आगी प्रकरणी मनसे नेते संदीप देशापांडे यांनी ट्विट केलंय.  कमला मिलवर कारवाई न करण्यासाठी आयुक्तांना कोणाचा फोन आला होता असं देशपांडेनी प्रश्न उपस्थित केला . कमला मिल कम्पाऊंडमधल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी आयुक्त अजोय मेहता यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणणारा हा महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा नेता आहे की विरोधी पक्षातला 'भैया' आहे ? आयुक्तांनी त्याचे नाव जाहीर करावे, नाहीतर खरंखोटं नेमकं काय आहे हे बाहेर येण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी ही आमची मागणी आहे, असं त्यांनी म्हटलंय.

कमला मिल आग दुर्घटनेनंतर दोषी हॉटेलमालकाविरोधातली कारवाई थांबवण्यासाठी एका नेत्यानेच फोन करून दबाव आणल्याचा खळबळजनक आरोप बीएमसीचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केलाय. विशेष म्हणजे पालिका सभागृहातच त्यांनी हा गंभीर आरोप केल्याने कमला मिल आग दुर्घटनेचं गांभीर्य आणखीनच वाढलंय. अर्थात आयुक्तांनी या नेत्याचं नाव घेणं टाळलं असलं तरी हॉटेलमालकावरील कारवाई थांबवण्यासाठी थेट पालिका आयुक्तांवर दबाव टाकणारा 'तो' नेता कोण ? याचीच चर्चा बीएमसी पालिका वर्तुळात सुरू झालीय.

गेल्या 28 डिसेंबरला मुंबईतल्या कमला मिल परिसरातील मोजोस आणि वन अबाव्ह या दोन हॉटेलमध्ये आग लाग लागल्याने 14 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी अग्निशमन दलाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली होती. पण हीच ऑन द स्पॉट कारवाई थांबवण्यासाठी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांना एका नेत्याने फोन केला होता. स्वतः पालिका आयुक्तांनीच हा गौप्यस्फोट केल्याने मुख्यमंत्री या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का ? असा प्रश्न विरोधक विचारताहेत.

First published: January 6, 2018, 9:54 AM IST

ताज्या बातम्या