'स्मृतीभंश झालेल्या चौकीदाराचा उपचार कसा करायचा?' मनसे नेत्याचा सवाल

पंतप्रधान मोदींनी एका कार्यक्रमात डिस्लेक्सिया आजाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला.

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 12:25 PM IST

'स्मृतीभंश झालेल्या चौकीदाराचा उपचार कसा करायचा?' मनसे नेत्याचा सवाल

मुंबई, 5 मार्च : स्मृतीभंश झालेल्या चौकीदाराचा उपचार कसा करायचा? असा सवाल करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी एका कार्यक्रमात डिस्लेक्सिया आजाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. त्यावरूनच संदीप देशपांडे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

शालेय मुलांच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांना डिस्लेक्सिया आजाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना हा आजार असल्याचं म्हटलं. त्यावरून सोशल मीडियावर मोदींवर टीका करण्यात येत आहे. यातच आता संदीप देशपांडे यांनी ट्विट करत हल्लोबोल केला आहे.

'डिस्लेक्सिया आजारावर उपचार होऊ शकतो. पण स्मृतीभंश झालेल्या चौकीदाराचा उपचार कसा करायचा?' असं ट्वीट संदीप देशपांडेंनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी याआधी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असंच देशपाडेंनी यांनी आपल्या ट्वीटमधून सुचित केलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या राहुल गांधींवरील याच टिपण्णीबाबत काँग्रेस नेत्यांनीही मोदींवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. 'मोदी, तुमची लाज वाटते. यापेक्षा खालच्या पातळीवर तुम्ही जाऊ शकत नाही. कोणत्याही नदीत स्नान केलं तरीही तुमच्या मनातील असंवेदनशीलता धुतली जाणार नाही,' असं सिद्धरामय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

VIDEO : बायको उद्या राष्ट्रवादीकडून लढली तरी, प्रचार सेनेच्या उमेदवाराचाच - चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 10:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...