02 डिसेंबर : काँग्रेस कार्यालय तोडफोडप्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंसह ९ कार्यकर्त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळालीय. किला कोर्टात हा निर्णय दिला गेला. काल या सगळ्यांना अगोदर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर अटक केली होती.
सुरक्षेच्या प्रश्नावरून यांना पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.
मनसे विरुद्ध संजय निरुपम वाद आता आणखी चिघळलाय. कॉंग्रेसचं कार्यालय फोडल्याची जबाबदारी मनसेनं घेतली. त्याबाबतचं ट्वीटसुद्धा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केलंय. 'भैय्या निरुपम वर सर्जिकल स्ट्राईक, इट का जवाब पथ्थरसे' असं ट्वीट यानंतर संदीप देशपांडेंनी केलं होतं. आझाद मैदान पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह नऊ कार्यकर्त्यांना दुपारी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर देशपांडे यांच्यासह नऊही जणांना अटक करण्यात आली.
संदीप देशपांडेसह 9 कार्यकर्त्यांवर दंगा करणे, ट्रेस पासिंग म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेत जबरदस्तीनं घुसणे, दुसऱ्यांची मालमत्तेची तोडफोड करणे, मुंबई पोलीस कायदा अशा अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा