मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सनातन धर्म म्हणजे काय? कार्ति चिदंबरम यांच्या प्रश्नावर मिलिंद देवरा यांनी दिलं उत्तर

सनातन धर्म म्हणजे काय? कार्ति चिदंबरम यांच्या प्रश्नावर मिलिंद देवरा यांनी दिलं उत्तर

Sanatana Dharma: माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी खासदार कार्ति चिदंबरम यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. सनातन धर्म म्हणजे काय हे मिलिंद देवरा यांनी सांगितलं आहे.

Sanatana Dharma: माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी खासदार कार्ति चिदंबरम यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. सनातन धर्म म्हणजे काय हे मिलिंद देवरा यांनी सांगितलं आहे.

Sanatana Dharma: माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी खासदार कार्ति चिदंबरम यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. सनातन धर्म म्हणजे काय हे मिलिंद देवरा यांनी सांगितलं आहे.

मुंबई, 12 जानेवारी : काँग्रेस पक्षाचे खासदार कार्ति चिदंबरम (Karti Chidambaram) यांनी ट्विटरवर एक प्रश्न विचारला होता या प्रश्नावर काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी उत्तर दिलं आहे. कार्ति चिदंबरम यांनी आठवड्याभरापूर्वी ट्विटरवर आपल्या फॉलोअर्सला विचारलं होतं की, सनातन धर्म काय आहे? (What is Sanatana Dharma) या प्रश्नावर माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी एक फोटो शेअर करत उत्तर दिलं आहे. मिलिंद देवरा यांनी अध्यात्मिक गुरू श्री चिन्मॉय यांचा फोटो ट्विट करत सनातन धर्म म्हणजे काय हे सांगितलं असून चिदंबरम यांच्याकडून लिहिण्यात झालेल्या चुकीचाही समाचार घेतला आहे.

वाचा : भाजप अलर्ट मोडवर; अमित शहांच्या उपस्थितीत 10 तास खलबतं, विरोधकांना देणार झटका

मिलिंद देवरा यांनी सांगितले सनातन धर्म म्हणजे काय?

मिलिंद देवरा यांनी लिहिले, "माझ्या मित्रा, सनातन धर्म ना धार्मिक शिकवण आहे ना नैतिक संहिता. त्याचा मानवनिर्मित जाती आणि सांप्रदायिकतेशी काहीही संबंध नाही. हा शाश्वत नियम आहे जो ब्रम्हांड आणि आपल्या आंतरिक स्वरूपाची निर्मिती करतो, बांधतो आणि नियंत्रित करतो."

कार्ति चिदंबरम यांनी ट्विट करताना इंग्रजीत Santana लिहिलं होतं ज्यावर त्यांनी माफीही मागितली. यावर मिलिंद देवरा यांनी अमेरिकन गिटारिस्ट कार्लोस संताना यांच्याही अशाच स्पेलिंगसह उल्लेख करत कार्ति चिदंबरम यांना चिमटा काढला आहे.

मिलिंद देवरा यांनी दिलेल्या या उत्तरावर काहींनी प्रतिक्रिया देत म्हटलं, तो "मनिष तिवारी 2.0 आहे आणि लवकरच भाजपत प्रवेश करेल". तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं "तुम्ही चुकीच्या पक्षात आहात".

भाजप जाण्याची चर्चा

मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. मिलिंद देवरा हे अशा काँग्रेस नेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या भाजप प्रवेशाची अेकदा चर्चा झाली आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात मिलिंद देवरा यांनी गुजरात सरकारच्या कामाचे कौतुक केले होते त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावळी मिलिंद देवरा यांनी लिहिले होत की, "काँग्रेसने आपले जुने स्थान पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. देशातील एक मोठा पक्ष म्हणून हे करू शकतो आणि करायला हवे. आपल्याकडे अजूनही असे नेते आहेत ज्यांचा सक्षम आणि चांगला उपयोग केला तर परिणाम देऊ शकतात. माझे अनेक मित्र, आदरणीय सहकारी आणि मोलाचे सहकारी यांनी आमची साथ सोडली नसती अशी माझी इच्छा आहे."

मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षाचा हात सोडणार असल्याची जोरदार चर्चा होत असली तरी मात्र, अद्याप तरी असे झालेलं नाहीये आणि मिलिंद देवरा हे भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळला आहे.

First published:

Tags: Mumbai, काँग्रेस