मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

दाऊदच्या जागेवर 'सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट' पण संस्थेशी संबंध नाही, मलिकांना जमीन मालकाचे उत्तर

दाऊदच्या जागेवर 'सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट' पण संस्थेशी संबंध नाही, मलिकांना जमीन मालकाचे उत्तर

'सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट' ही माझी व्यक्तिगत ट्रस्ट आहे. या ट्रस्टचा इतर कुठल्याही संस्थेशी संबंध नाही, असा खुलासा श्रीवास्तव यांनी केला.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 09 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावर (mumbai cruise drug case) आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच आहे. राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी आज भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उत्तर देत असताना सनातन संस्थेचा (sanatan sanstha) उल्लेख केला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची (dawood ibrahim) जागा सनातन संस्था कशी वापरते असा सवाल केला होता. अखेर, यावर जागा विकत घेणारे वकील अजय श्रीवास्तव (advocate ajay srivastava  ) यांनी खुलासा केला आहे.

कोकणातील दाऊद इब्राहिमची जागा सनातन संस्थेनं घेतल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यांच्या आरोपवर वकील अजय श्रीवास्तव यांनी दैनिक लोकमतशी बोलत असताना स्पष्टीकरण दिलं.

'सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट' ही माझी व्यक्तिगत ट्रस्ट आहे. या ट्रस्टचा इतर कुठल्याही संस्थेशी संबंध नाही, असा खुलासा श्रीवास्तव यांनी केला.

Share Market : शेअर बाजारात आज घसरण; उद्या कशी असेल बाजाराची दिशा?

तसंच, या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मदरश्यातून ज्या प्रकारे शिक्षण दिले जाते तसंच सनातन धर्म पाठशाळेतून देण्यास सुरुवात केली. त्याचे पहिले केंद्र या जागेतूनच सुरू केले, असंही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं.

आलिया कश्यपच्या बॉयफ्रेंडसोबतच्या लिपलॉक फोटोवर जान्हवी कपूरची कमेंट

दरम्यान, मलिक यांच्या आरोपावर सनातन संस्थेनंही खुलासा केला आहे. मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणात आता हीन दर्जाचे राजकारण सुरू आहे. मलिक यांनी आपल्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठी सत्य न जाणून घेताच आरोप केले आहे. सनातन संस्थेनं दाऊदची कोणतीही मालमत्ता विकत घेतली नाही. ज्या जागेचा मलिक यांनी उल्लेख केला होता. त्या दाऊदच्या मालमत्तेबद्दल लिलाव करण्यात आला होता. ही जागा दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी विकत घेतली होती. त्या जागेवर आता लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी सनातन धर्म पाठशाळा नावाने गुरुकुल सुरू करण्यात आले आहे. सनातन संस्था आणि अॅड. अजय  श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही, असाही खुलासा केला.

First published: