राज्यपालांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्यपालांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी राजभवनावर जाऊन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 23 मे : राज्याचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात  शासकीय निर्णय घेण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भेटीला पोहोचले होते. 'राज्यपाल आणि सरकारचे संबंध गोड आहेत.  राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत' अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी राजभवनावर जाऊन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.  संजय राऊत आणि राज्यपाल यांच्यात 15-20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. राज्यपालांची भेट घेऊन राजभवानातून बाहेर पडल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'राज्यपालांसोबत ही  सदिच्छा भेट होती. खूप दिवसांपासून भेट घेण्याचं नियोजन होतं. पण, त्यांची काही भेट होऊ शकली नाही. त्यांचे आणि माझे जुने संबंध आहे. देशात काही घटना घडल्यात त्या संदर्भात मी नेहमी लिखाण करत असतो. त्यामुळे मी फक्त राज्यपालांसाठी लिहिलं असं काहीही नव्हतं' असं राऊत म्हणाले.

हेही वाचा -पहिलं कोरोना वॅक्सिन ज्याचं 100 रुग्णांवर झालं ट्रायल, वाचा काय आला रिझल्ट

'राज्यपाल सरकारवर नाराज आहे, असे प्रश्न विचारले जात आहे. मुळात त्यांचे आणि सरकारचे संबंध गोड आहेत. राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध हे चांगले आहेत. त्यांचे संबंध हे एखाद्या पिता पुत्राप्रमाणे आहे' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

मंत्री उदय सामंत यांच्या निर्णयाबद्दल राज्यपालांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले की,  उदय सामंत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी अजून निर्णय घेतला नाही. राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती आहे. त्यामुळे ते इतर मंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतली' असं राऊत यांनी सांगितलं.

तसंच, 'राज्यपाल हे सर्वांसाठी प्रियच असतात ते फक्तं विरोधी पक्षांसाठीच नसतात' असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19100 कोटी रुपये

विशेष म्हणजे, गेले दोन महिने राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात चांगलीच जुंपल्याचं चित्र निर्माण झालंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य बनवण्याचा प्रस्ताव असो नाहीतर कोरोना संदर्भात राज्यातील प्रमुख प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची राजभवनवर बैठक बोलवणं असो अशा अनेक मुद्यांवर संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यामुळे या भेटीतून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील तणाव दूर होईल का, हे पाहण्याचं ठरणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 23, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading