'समृद्धी महामार्गाला अवघ्या 22 गावांचाच विरोध'

'समृद्धी महामार्गाला अवघ्या 22 गावांचाच विरोध'

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गादरम्यान येणाऱ्या ३९२ गावांपैकी ३७० गावांमध्ये मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून 22 गावांमध्ये या महामार्गाला विरोध आहे असा दावा एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांनी केला आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

01 जून : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गादरम्यान येणाऱ्या ३९२ गावांपैकी ३७० गावांमध्ये मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून 22 गावांमध्ये या महामार्गाला विरोध आहे असा दावा एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांनी केला आहे.

२०१३ चा भूमीसंपादन कायद्यानुसार रेडीरेकनर किंवा खरेदी-विक्रीची किंमत यापैकी ज्याची किंमत जास्त असेल ती किंमत गृहीत धरुन त्याच्या चारपट मोबदला दिला जाईल असंही मोपलवार यांनी सांगितलं. तसंच हा मोबदला अॅडव्हान्स दिला जाईल असंही मोपलवार यांनी सांगितलंय.

प्रत्येक गावातील जमिनीचे दर हे वेगवेगळे आहेत, एखाद्या गावातल्या जमीनीचा रेडीरेकनरचा जो दर आहे, खरेदी-विक्रीचे जे रजिस्टर्ड व्यवहार आहेत गेल्या तीन वर्षातले जे ५० टक्के व्यवहार जास्त किंमतीचे आहेत त्यांची सरासरी काढून ती किंमत किंवा रेडीरेकनर यांच्यापैकी जास्त किंमत ज्याची असेल त्याच्या चारपट किंमत मोबदला म्हणून देणार असल्याचंही मोपलवार यांनी सांगितलंय.

समृद्धी महामार्गाबाजूला काही सरकारी अधिकाऱ्यांनी शेकडो एकर जमीन घेतली असेल तर त्याबद्दल महसूल विभाग लक्ष घालेल असं मोपलवार यांनी म्हणत याबद्दल अधिक काही म्हणणं टाळलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपली वैयक्तिक चर्चा झाली त्यांच्या मनात या प्रकल्पाबद्दल शंका नाहीये असा दावा मोपलवार यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 10:07 PM IST

ताज्या बातम्या