बोलणे, डोलणे फोल गेले! - सेनेची नोटाबंदीच्या मुद्द्यावर टीका

बोलणे, डोलणे फोल गेले! - सेनेची नोटाबंदीच्या मुद्द्यावर टीका

सरकारला नोटाबंदीच्या बाबतीत डोंगर पोखरून उंदीर काय, तर झुरळही बाहेर काढता आलेलं नाही अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई,01 सप्टेंबर: नोटाबंदीच्या मुद्दयावरून सरकारवर सगळीकडून टीका होत असतानाच आता सामनातूनही सरकारवर टीका करण्यात आली आहे. सरकारला नोटाबंदीच्या बाबतीत डोंगर पोखरून उंदीर काय, तर झुरळही बाहेर काढता आलेलं नाही अशी टीका सामनातून  करण्यात आली आहे.

सरकारचं बोलणे डोलणे फोल गेलं असंही सामन्यात म्हटलं गेलंय. 'नोटाबंदीच्या काळात  रांगेत मेलेल्या देशभक्तांना सरकारने स्वातंत्र्यसैनिकांचे पेन्शन वगैरे सुरू केले आहे काय?'  असा सामनातून सवालही विचारण्यात आला आहे. तर नोटाबंदीचे ढोल कितीही वाजवा, हा निर्णय यशस्वी झालेला नाही आणि काळा पैसावाल्यांचा बालही बाका झाला नाही अशी सडकून टीका सामनामध्ये  करण्यात आली आहे.

'नोटाबंदी हा भयंकर प्रकार असून देशाची अर्थव्यवस्था संपवून टाकेल असे बोलणारे तेव्हा आम्हीच पहिले होतो, पण नोटाबंदीविरोधात बोलणारे तेव्हा देशद्रोही ठरवले गेले'. असंही सामनात  म्हटलं गेलंय. तर नोटाबंदीनंतर ज्या 'उंदीरमामांनी' उद्धट भाषा वापरली त्यांनी जनतेची व देशाची माफीच मागायला हवी अशी मागणी सामनामधून  करण्यात येते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 11:18 AM IST

ताज्या बातम्या