Home /News /mumbai /

वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुरुंगवास तर निश्चित; नवाब मलिकांचा समीर वानखडेला इशारा

वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुरुंगवास तर निश्चित; नवाब मलिकांचा समीर वानखडेला इशारा

एनसीबीचे मुंबई विभागीय (Sameer Wankhede will be jobless and in the jail warns Nawab Malik) संचालक समीर वानखडे यांची बोगसगिरी चव्हाट्यावर आणण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : एनसीबीचे मुंबई विभागीय (Sameer Wankhede will be jobless and in the jail warns Nawab Malik) संचालक समीर वानखडे यांची बोगसगिरी चव्हाट्यावर आणण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिका नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मधील (Nawab Malik attacks NCB) अधिकाऱ्यांवर टीका करत असून क्रूझवर ड्रग्जबाबत करण्यात आलेली कारवाई ही बोगस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वर्षभरात तुझी नोकरी जाईल आणि (Nawab Malik on Sameer Wankhade) तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं जाहीर आव्हान त्यांनी समीर वानखडेला दिलं आहे. काय म्हणाले नवाब मलिक? समीर वानखडेवर नवाब मलिकांनी अत्यंत कडक भाषेत टीका केली आहे. वानखडेचा बोगस कारभार पूर्णपणे बोगस असून त्याचा बाप आणि घरातले सगळे बोगस असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या जावयाला तुरुंगात टाकलं आणि आता आपल्याला तो फोन करत आहे. यात आपला काहीच हात नसल्याचं तो सांगतो. असं असेल, तर हे बोगस प्रकार तू कुणाच्या सांगण्यावरून करतो आहेस, याचं उत्तर दे, असं आव्हान मलिकांनी वानखडेला दिलं आहे. काढला एकमेकांचा बाप आपण तुझ्या बापाला घाबरत नसून तुझा कोण बाप आहे, ते मला सांगच, असं म्हणत मलिकांनी वानखडेला खडे बोल सुनावले आहेत. समीर वानखडेला तुरुंगात टाकल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. वर्षभरात समीर वानखडेची नोकरी जाईल आणि त्याचं सत्य महाराष्ट्रासमोर येईल, असं आव्हान त्यांनी दिलं आहे. हे वाचा- लहान मुलांच्या लसीकरणाविषयी मोठी बातमी! COVOVAX ला या महिन्यात मिळणार मान्यत काय आहे प्रकरण? क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे. यापूर्वीदेखील त्यांनी समीर वानखडेवर आरोप केले होते. सुशांत सिंग केसमध्ये रिया चक्रवर्तीवर आणि इतर बॉलिवूड कलाकारांवर खोट्या केस दाखल केल्याचा आरोप त्यांनी वानखडेवर केला होता. तर त्यापूर्वी भाजप आणि एनसीबी एकमेकांच्या साथीनं मुंबईत आतंकवाद पसरवत असल्याचा आरोप त्यांनी बुधवारी केला होता.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Drugs, NCB, NCP

    पुढील बातम्या