मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'नवाब मलिकांचे आरोप चोपडेपणासारखे, किचन पॉलिटक्समधून बाहेर या' पती समीर वानखेडेची बाजू घेत क्रांती रेडकर संतापल्या

'नवाब मलिकांचे आरोप चोपडेपणासारखे, किचन पॉलिटक्समधून बाहेर या' पती समीर वानखेडेची बाजू घेत क्रांती रेडकर संतापल्या

'नवाब मलिकांचे आरोप चोपडेपणासारखे, किचन पॉलिटक्समधून बाहेर या' पती समीर वानखेडेची बाजू घेत क्रांती रेडकर संतापल्या

'नवाब मलिकांचे आरोप चोपडेपणासारखे, किचन पॉलिटक्समधून बाहेर या' पती समीर वानखेडेची बाजू घेत क्रांती रेडकर संतापल्या

Kranti Redkar angry over Nawab Malik Allegation: नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर क्रांती रेडकर संतापल्या. नवाब मलिकांना क्रांती रेडकर यांनी दिलं प्रत्युत्तर.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 26 ऑक्टोबर : नवाब मलिक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. आज पुन्हा एकदा नवाब मलिकांनी (Nawab Malik) पत्रकार परिषध घेत समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केला. या आरोपांनंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

क्रांती रेडकर यांनी म्हटलं, आजकाल बायकापण असं वागत नाहीत, महिला पण पुढारलेल्या आहेत. पण किचनमध्ये चोमडेपणा करतात ना?... तुला माहिती आहे का? असं झालं... तसं झालं.... हे तसंच सुरू आहे. किचन पॉलिटिक्स. असं म्हणत नवाब मलिकांचे आरोप चोमडेपणासारखे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यातून आता थोडं वर यायला हवं. मालदिवमध्ये म्हणे बॉलिवूड सेलिब्रेटी होते.. मग सांगा कोण सेलिब्रेटी होते. एक ट्विटर तुम्हाला मिळालं आहे आमि त्यावर काहीही लिहित आहात. तुम्ही एक रिस्पेक्टेड पर्सन्रलिटी आहात त्यामुळे असं काहीही लिहू नका असं आवाहनही यावेळी क्रांती रेडकर यांनी केलं आहे.

नवाब मलिकांच्या आरोपांना वेळच उत्तर देईल

माझा पती खोटारडा नाही, रोज काय काय स्पष्टीकरण देत बसायचं? समीर वानखेडेंच्या वडिलांनी आधीच जन्म दाखला सादर केला आहे. समीर वानखेडे यातून नक्कीच बाहेर येतील. त्यांना अडकवण्याचा आणखी प्रयत्न होईल मात्र, हे आरोप सिद्ध होणार नाहीत. सत्याचा नेहमी विजय होतो. समीर वानखेडे सत्याच्या मार्गाने काम करतात, ते अनेकांना खटकतं. आम्ही नेहमीच लढत राहू. नवाब मलिकांच्या आरोपांना वेळच उत्तर देईल असंही क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.

मलिकांना क्रांती रेडकरने दिल्या शुभेच्छा

मी नवाब मलिकांना केवळ इतकंच सांगू इच्छिते की, मी तुम्हाला शुभेच्छा देते, तुमचं कुटुंब चांगलं रहावं, आनंदी रहावं. आमच्याकडून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल.

मराठी असल्याचा अभिमान पण, धमक्या येतात हे सुद्धा तितकेच सत्य आहे. जातीवरुन केलेले खोटे आरोप सहन करणार नाही. सोशल मीडियात ट्रोल करणाऱ्यांचा शोध लावणार, आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. धमक्या देणाऱ्यांचा लवकरच पर्दाफाश होईल असंही क्रांती रेडकर यांनी म्हटलं.

क्रांती रेडकर आणि जास्मिन यांनी म्हटलं, पुरावे असतील तर कोर्टात जावं, ट्विट करुन लोकांचा वेळ वाया का घालवता? मंत्री म्हणून सोशल मीडियाचा योग्य वापर करा, नवाब मलिकांना आवाहन केलं आहे. समीर वानखेडेंच्या बदलीने कुणाचा फायदा? असा सवालही विचारण्यात आला आहे.

First published:

Tags: Drug case, Nawab malik