बॉलिवूडमध्ये एका मराठमोळ्या नावाची दहशत, ड्रग्ज कनेक्शनचा छडा लावणारा NCB अधिकारी चर्चेत

बॉलिवूडमध्ये एका मराठमोळ्या नावाची दहशत, ड्रग्ज कनेक्शनचा छडा लावणारा NCB अधिकारी चर्चेत

हा मराठमोळ्या अधिकाऱ्याने बॉलिवूडमधील अनेकांनी झोप उडवली आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नीही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे समोर येत आहे. त्यामुळे एकंदर सध्या बॉलिवूड दहशतीखाली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput) ड्रग्ज एंगल समोर आल्यानंतर आता या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढली आहे. ड्रग्ज बाबत पुरावे मिळाल्यानंतर आता या प्रकरणात तपास करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो NCB ने एन्ट्री घेतली आहे.

मात्र यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आता एनसीबीने एक अत्यंत हुशार व कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला येथे पाचारण केले आहे. या मराठमोळ्या अधिकाऱ्याचं नाव आहे समीर वानखेडे. या अधिकाऱ्याच्या प्रवेशानंतर बॉलिवूडमधील अडचणी वाढल्या आहेत.

कोण आहे समीर वानखेडे

समीर वानखेड़े (Sameer Wankhede) महाराष्ट्रातील राहणारे असून ते 2008 बॅचचे भारतीय राजस्व सेवा आयआरएसचे अधिकारी आहेत. आयआरएसमध्ये आल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली. येथे डेप्युटी कमिश्नर म्हणून ते तैनात होते. अत्यंत हुशार व शार्प असल्याने त्यांना आंध्रप्रदेश आणि त्यानंतर दिल्लीतही काही केससाठी पाठविण्यात आलं आहे. समीर यांना ड्रग्ज व नशा यासंबंधित जोडलेल्या प्रकरणाबाबत स्पेशालिस्ट मानलं जातं.

हे ही वाचा-केवळ दीपिका-सारा नाही तर अन्य 39 बॉलीवूड सेलिब्रिटी NCBच्या रडारवर

कोटींचं रॅकेट पकडलं

समीर वानखेडे अत्यंत हुशारीने केस हाताळतात. याच कारणाने त्यांना अनेक मोठ्या केसेस सोपविण्यात आल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2 वर्षात तब्बल 17 हजार कोटी रुपये ड्रग्ज आणि नशेचे रॅकेट समोर आले आहेत. हुशारी व धागे-दोरे एकत्र करणाऱ्या समीर वानखेडे यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो येथे ट्रान्सफर करण्यात आलं.  समीरबद्दल असं म्हटलं जातं की ते कोणत्याही सेलिब्रिटीला भाव देत नाहीत. त्यांना मुंबई पोलिसातील सर्वात कडक अधिकारी मानलं जातं.

समीर यांनी अनुराग कश्यप, विवेक ऑबेरॉय, रामगोपाल वर्मासह अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरात छापेमारी केली आहे. जेव्हा त्यांनी 2013 मध्ये गायक मिक्का सिंह याला मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह पकडलं होतं, तेव्हा ते चर्चेत आले होते. त्यावेळी समीर वानखेडे यांनी मिक्का सिंहवर कारवाई केली होती.

पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

समीर वानखेडे यांच्या पत्नीचं नाव क्रांती रेडकर आहे. क्रांतीने मराठीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. क्रांतीने अजय देवगनबरोबर गंगाजल चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय तिने टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 25, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading