मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

समीर वानखेडेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, अर्धा तास केली चर्चा, कारण गुलदस्त्यात

समीर वानखेडेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, अर्धा तास केली चर्चा, कारण गुलदस्त्यात

  समीर वानखेडे यांनी आज रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली.

समीर वानखेडे यांनी आज रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली.

समीर वानखेडे यांनी आज रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली.

मुंबई, 16 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणी (drug party on a cruise) आर्यन खानला (aryan khan) अटकेमुळे वादात अडकलेले अंमली विरोधी पथकाचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede)  यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) यांची भेट घेतली. या भेटीबद्दल वानखेडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याच मात्र टाळलं.

समीर वानखेडे यांनी आज रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. जवळपास 25 मिनिटे ही बैठक चालली होती. या बैठकीचे कारण मात्र समोर येऊ शकले नाही. समीर वानखेडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देण्याचे टाळले.  या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आहे.

याआधीही समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी एकापाठोपाठ गंभीर आरोप केले होते, तेव्हा समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहिलं होतं. मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं समीर वानखेडेंनी म्हटलं होतं. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, अशी विनंतीही त्यांनी केली होती.

Bank Jobs: सांगोला अर्बन बँक सोलापूर इथे विविध जागांसाठी जागा रिक्त

दरम्यान, मुबंई एनसीबीने नांदेडमध्ये जप्त केलेल्या गांजा प्रकरणातील दोन आरोपींना नायगाव न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबई एनसीबीच्या पथकाने नांदेड जिल्यात गांजा घेऊन जाणारा ट्रक पकडला होता. आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापटणम येथून गांजा महाराष्ट्रात येणार असल्याची गोपनीय माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार मुंबई एनसीबीच एक पथक नांदेड मधील सीमावर्ती भागात तळ ठोकून होते.

lose weight Tips: पोटाची चरबी गायब करेल फक्त 1 लिंबू; आहारात असा करा समावेश

सोमवारी पहाटे नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून गांजा भरून जाणारा ट्रक राज्यात दाखल झाला. एनसीबीच्या पथकाने तब्बल 22 किलोमिटर पाठलाग करत हा ट्रॅक पकडला. नायगाव तालुक्यातील मांजरम या गावात ट्रक अडवून तपासणी करण्यात आली तेव्हा या ट्रकमध्ये तब्बल 101 किलो गांजा आढळला. गांजा घेऊन हा ट्रक जळगाव येथे जाणार होता. दरम्यान, ट्रक चालक गोकुळ नारायण राजपूत आणि सुनिल यादव महाजन यांना एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलं. ट्रक चालक हा नांदेडचा तर सुनील यादव हा जळगावचा रहिवाशी आहे. या दोन्ही आरोपींना एनसीबीने नायगाव न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

First published: