Home /News /mumbai /

Sameer Wankhede यांना मोठा दिलासा, 'प्राथमिक चौकशीत धर्मांतर केल्याचं दिसत नाहीये' राष्ट्रीय मगासवर्ग आयोगाने केलं महत्त्वाचे वक्तव्य

Sameer Wankhede यांना मोठा दिलासा, 'प्राथमिक चौकशीत धर्मांतर केल्याचं दिसत नाहीये' राष्ट्रीय मगासवर्ग आयोगाने केलं महत्त्वाचे वक्तव्य

Sameer Wankhede: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी आरोप केले आहेत. मात्र, आता समीर वनाखेडे यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

    मुंबई, 31 ऑक्टोबर : मुंबईतील क्रूझवर ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने (NCB) छापा टाकून कारवाई केली. ही कारवाई केलेले मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. त्याच दरम्यान आता एक मोठी बातमी आली आहे. समीर वानखेडे यांनी धर्मातर केले नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी अरुण हलदर यांची भेट घेत आपले कागदपत्रे त्यांच्याकडे सोपवली त्यानंतर अरुण हलदर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी ही प्रतिक्रिया दिल्याने समीर वानखेडे यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी म्हटलं, समीर वानखेडे यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली आहे. या कागदपत्रांवरुन समीर वानखेडे यांनी धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नाही. तुम्ही मागासवर्गीय आहात का? असे मी समीर वानखेडे यांना विचारलं तर त्यांनी हो असं उत्तर दिलं. त्यासोबतच त्यांनी माझ्याकडे काही कागदपत्रेही सोपवली आहेत असं अरुण हलदर यांनी म्हटलं आहे. वाचा : 'मुंबई आणि ठाण्यातून वानखेडेंकडून बेकायदा फोन टॅपिंग, अनेक पुरावे हळूहळू बाहेर काढणार' : नवाब मलिक नवाब मलिकांचा वानखेडेंवर आरोप नवाब मलिकांनी म्हटलं, काल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची वानखेडे यांनी भेट घेतली. मी माझ्या मतावर ठाम आहे की समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मुस्लिम होते. बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली. 2015 पासून यांनी आपली आयडेंटिटी लपवली. म्हणजे दाऊद वानखेडे यांनी डी के वानखेडे नावं लिहिलं. आता ज्ञानदेव वानखेडे लिहायला सुरुवात केली. वानखेडे यांनी त्यांची सून आणि जावई जर आपल्या सोबत राहिले तर आपली आयडेंटिटी ओपन होईल यासाठी दोघांना घटस्फोट दिला. बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवल्याचा आरोप या व्यक्तीने बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे... ज्या जन्म प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे नाव आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे. पूर्ण परिवार मुस्लिम म्हणुन जगत आहेत, हे सत्य आहे. दलित संघटनांबरोबर आम्ही बोलत आहोत. या बाबतीत दलित संघटना तक्रार करतील. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सत्य देशासमोर येईल. जातवैधता समितीसमोर समीर वानखेडे यांचा दाखला पाठवणार आहोत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Nawab malik, NCB

    पुढील बातम्या