• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • आईवडिलांचा धर्म जाहीर करत समीर वानखेडेंचं मलिकांना उत्तर, लग्न आणि घटस्फोटाचाही खुलासा

आईवडिलांचा धर्म जाहीर करत समीर वानखेडेंचं मलिकांना उत्तर, लग्न आणि घटस्फोटाचाही खुलासा

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी आपल्या (Sameer Wankhede explains about his parents and marital life) आईवडिलांच्या धर्माविषयी आणि स्वतःच्या वैवाहिक आयुष्याविषयीची माहिती जाहीर केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी आपल्या (Sameer Wankhede explains about his parents and marital life) आईवडिलांच्या धर्माविषयी आणि स्वतःच्या वैवाहिक आयुष्याविषयीची माहिती जाहीर केली आहे. आर्यन खान अटक आणि क्रूझ ड्रग्ज प्रकरणाबाबत एनसीबी आणि समीर वानखेडेंवर होणाऱ्या (Sameer Wankhede on Nawab  Malik) आरोपांना त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आपले वडील हिंदू होते आणि आई मुस्लीम होती असं सांगत आपण भारतीय पंरपरेतील एका संमिश्र आणि बहुधर्मीय (Liberal family) धर्मनिरपेक्ष कुटुंबातील असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. काय आहे प्रकरण? राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर समीर दाऊद वानखेडे असं नाव घेत फर्जीवाडा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर आता वानखेडेंनी उत्तर दिलं आहे. शिवाय आर्यन खान प्रकरणातील एका पंचाने समीर वानखेडेंवर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीने हे आरोप फेटाळले असून समीर वानखेडेंनी त्यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत आरोपांना उत्तर दिलं आहे. काय म्हणाले वानखेडे? समीर वानखेडे यांनी आपल्या आईवडिलांबाबत माहिती दिली आहे. माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे 30 जून 2007 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यातून निवृत्त झाले. माझी आई स्वर्गीय झहीदा या मुस्लीम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील असून आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान आहे, असं वानखेडे यांनी म्हटलं आहे. हे वाचा- स्काउटच्या विद्यार्थ्यांना PMच्या स्वाक्षरीसाठी तब्बल 12 वर्षे पाहावी लागली वाट दिली वैवाहिक आयुष्याची माहिती सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित दस्तावेज प्रकाशित करणं चुकीचं असून आपल्या आईवडिलांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपण 2006 साली डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले आणि 2016 साली घटस्फोट घेतला आणि त्यानंतर क्रांती दीनानाथ रेडकर यांच्याशी लग्न केले, असा खुलासा त्यांनी केला. काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या वक्तव्यांनी आपल्याला मानसिक दबावाखाली ठेवल्याचं सांगत आपण आपलं स्पष्टीकरण न्यायालयात दिलं असल्याचं ते म्हणाले.
  Published by:desk news
  First published: