मुंबई, 27 ऑक्टोबर : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लिम असल्याचा दावा कऱण्यात येत आहे. समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे काझी मुजम्मिल अहमद यांनी हा दावा केला आहे. समीर वानखेडे, त्यांचे वडील हे मुस्लिम असल्याचंही काझी मुजम्मिल अहमद यांनी म्हटलं आहे. (Sameer Wankhede is muslim claim maulana)
काझी मुजम्मिल अहमद यांनी म्हटलं, समीर वानखेडे हे मुस्लिम होते. जर हिंदू असल्याचं सांगितलं असतं तर मी निकाह लावून दिलाच नसता. समीर मुसलमान होता, त्याचे वडील दाऊद मुसलमान होते, शबाना मुसलमान होती आणि तिचे वडिलही मुस्लिम होते. निकाहनामा सुद्धा हा बरोबर आहे. लोखंडवाला येथील एका हॉलमध्ये हा निकाल मोठ्या उत्साहात पार पडला होता.
समीर वानखेडेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
मौलाना यांनी केलेल्या या दाव्यावर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटलं, मौलाना खोटं बोलत आहेत. प्रभाकर साईल याच्याप्रमाणेच मौलानांनाही फोडण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात मी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार असून न्यायालयात धाव घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आरोप करत आहेत की, समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली आहे. एका होतकरू तरुणाची नोकरी समीर वानखेडेंनी हिरावली आहे. धर्मावरुन राजकारण करण्याचा माझा हेतू नाही. समीर वानखेडे याने बनावट जात प्रमणपत्र बनवून नोकरी मिळवली आहे. वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांना धमकावण्यात येत आहे असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केला आहे.
जन्म दाखला जर खोटा असेल तर खरा जन्म दाखला कुठे आहे ते त्यांच्या कुटुंबीयांनी सांगावे. मी आज मॅरिज सर्टीफिकेट ट्विट केले आहे. जबाबदारी ने सांगतो जे कागदपत्रे आहेत ते सर्व कागदपत्रे खरे आहेत. हा हिंदू मुस्लीम वाद नाही. जर धर्म परिवर्तन केले तर जात समाप्त होते. त्यांनी बनावट कागदपत्रे बनवले त्यांची नोकरी जाणार, खोटी कागदपत्रे बनवली तर 2 ते 4 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांच्या आरोपांना वेळच उत्तर देईल - क्रांती रेडकर
माझा पती खोटारडा नाही, रोज काय काय स्पष्टीकरण देत बसायचं? समीर वानखेडेंच्या वडिलांनी आधीच जन्म दाखला सादर केला आहे. समीर वानखेडे यातून नक्कीच बाहेर येतील. त्यांना अडकवण्याचा आणखी प्रयत्न होईल मात्र, हे आरोप सिद्ध होणार नाहीत. सत्याचा नेहमी विजय होतो. समीर वानखेडे सत्याच्या मार्गाने काम करतात, ते अनेकांना खटकतं. आम्ही नेहमीच लढत राहू. नवाब मलिकांच्या आरोपांना वेळच उत्तर देईल असंही क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.